सतत दादागिरी करणा-या रिक्षाचालकाची ठेचून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 05:32 PM2017-12-31T17:32:05+5:302018-01-01T10:18:45+5:30
दादागिरी करून खिशातील मोबाईल आणि पाचशे रुपये हिसकावणा-या रिक्षाचालक तरूणावर ब्लेड आणि चाकूने सपासप वार करून आणि सिमेंट गट्टूने ठेचून हत्या करण्यात आली.
औरंगाबाद : दादागिरी करून खिशातील मोबाईल आणि पाचशे रुपये हिसकावणा-या रिक्षाचालक तरूणावर ब्लेड आणि चाकूने सपासप वार करून आणि सिमेंट गट्टूने ठेचून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना शनिवारी(दि.३०)डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास रोजाबाग येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन मारेक-यांना अटक केली.
शेख सर्फराज शेख सांडू(१८) आणि शेख अदिल शेख रफिक (१९,दोघे रा. रोजाबाग)अशी आरोपींची नावे आहेत. फेरोजखान फारूख खान(१९,रा.रोजाबाग)असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, मृत आणि आरोपी ऐकमेकांचे ओळखीचे असून रात्री साडेसहा वाजेच्या सुमारास शेख सर्फराज आणि अदिल हे सलीम अली सरोवराच्या मागील बाजूला असलेल्या बाभळबंदात नशा करीत बसले होते. काही वेळाने तेथे फेरोजखान आला. फेरोजने नेहमीप्रमाणे आरोपींवर दादागिरी करून त्याच्या सर्फराजच्या खिशातून पाचशे रूपये आणि मोबाईल हिसकावून घेतला. यावेळी झालेल्या झटापटीत फेरोजने सर्फ राज्या हातावर ब्लेडचा वार केला.यामुळे आरोपी तेथून निघून गेले. यानंतर दोघांनी त्यास संपवून ठाकण्यासाठी त्याच्यावर हल्ला चढविला.
यावेळी एकाने त्यास घट्ट पकडले तर दुस-याने त्याच्या गळ्यावर ब्लेड आणि चाकूने सपासप वार केले.या घटनेत फेरोज रक्तबंबाळ होऊन खाली पडला. यानंतर आरोपींनी बाजुला पडलेल्या सिमेंटच्या गट्टूने अक्षरक्षा त्याचे डोके ठेचले.यामुळे गट्टूचे दोन ते तीन तुकडे झाले. तो मृत झाल्याची खात्री करण्यासाठी त्यांनी त्याच्याच कमरेचा चामडी पट्ट्याने फेरोजचा गळा आवळला आणि सलीम अली सरोवराच्या पाण्यात ओढत नेले. पाण्यात बुडवून गळ्यातल्या बेल्टच्या दुसºया टोकाने तेथील बाभळीच्या फांदीला त्यास लटकावले. सुमारे अर्धा ते पाऊण तास आरोपींनी हे कृत्य केले.यानंतर ते तेथून पसार झाले. या घटनेची माहिती खब-याकडून पोलिसांना रात्री दहा वाजेच्या सुमारास मिळाली. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहायक निरीक्षक शैलजा जानकर आणि कर्मचा-यांनी प्र्रथम दोन्ही आरोपींना पकडले. नंतर त्यांनीच दाखविलेल्या घटनास्थळी जाऊन मृताचे प्रेत घाटी रुग्णालयात हलविले. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.