मराठवाड्यातील खाजगी साखर कारखन्यांचाच गळित हंगाम सुरू, अनेक सहकारी कारखाने बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 06:00 PM2021-11-26T18:00:05+5:302021-11-26T18:04:00+5:30
खाजगी साखर कारखान्यांचाच गळित हंगाम सध्या जोरात सुरू आहे.
- स.सो. खंडाळकर
औरंगाबाद: औरंगाबाद प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कार्यक्षेत्रातील खाजगी साखर कारखान्यांचाच गळित हंगाम सध्या जोरात सुरू आहे. औरंगाबाद, जालना, बीड, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांचा या कार्यक्षेत्रात समावेश होतो. क्रांती चौकात साखर सहसंचालकांचे कार्यालय आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात एकूण ११ खाजगी साखर कारखाने असून त्यातील १० कारखान्यांनी गळित हंगाम सुरू केला . जळगाव जिल्ह्यातील अंबाजी ( बेलगंगा) शुगर्स प्रा. लि. कासोदा, ता. चाळीसगाव हा खाजगी कारखाना सध्या बंद आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील बारामती ॲग्रो लि. युनिट-२, कन्नड, छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग, चितेपिंपळगाव, मुक्तेश्वर शुगर्स लि, धामोरी,ता. गंगापूर व घृष्णेश्वर शुगर्स प्रा. लि,गदाना, ता. खुलताबाद हे कारखाने सुरू झालेले आहेत. जालना जिल्ह्यातील समृध्दी शुगर्स लि. देवी दहेगाव, ता. घनसावंगी व श्रध्दा नजरी ॲंड इन्फ्रा प्रोजक्ट्स प्रा. लि.बागेश्वरी, युनिट -१, वरफळ, ता. परतूर व बीड जिल्ह्यातील एनएसएल शुगर्स लि, पवारवाडी, ता. माजलगाव व येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्ट्स लि, आनंदगाव सारणी, ता. केज हे खाजगी कारखाने सुरू झालेले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील शरद सहकारी साखर कारखाना, विहामांडवा हा सहकारी कारखाना सुरू झालेला आहे. बाकीचे सहकारी कारखाने बंदच आहेत. जालना जिल्ह्यातील अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, वडीगोद्री व तीर्थपुरी तसेच रामेश्वर सहकारी साखर कारखाना, रावसाहेबनगर, सिपोराबाजार, ता. भोकरदन सुरू झालेले आहे.
बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी, अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबासाखर, ता. अंबाजोगाई, सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, सुंदरनगर, तेलगा व, ता. धारुर, जय भवानी सहकारी साखर कारखाना, गढी, ता. गेवराई हे सहकारी साखर कारखाने सुरु झालेले आहेत.