शेवग्याच्या शेतीत आंतरपिक म्हणून गांजाची लागवड; शेतकऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 08:03 PM2023-09-01T20:03:18+5:302023-09-01T20:03:31+5:30
शेखपूर शिवारात शेतात लावलेला २१ लाख १८ हजारांचा गांजा पकडला
सिल्लोड: तालुक्यातील शेखपूर येथ शेवगा, वाल, एरंडी, व कापूस पिकात आंतरपिक म्हणून गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले. अप्परपोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने गुरुवारी सायंकाळी येथे छापा मारून २१ लाख १८ हजार रुपये किंमतीचा तब्बल ३५३.५२ किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे.
शेतकरी ज्ञानेश्वर नामदेव काजळे ( ४०, वर्ष रा. शेखपूर ता. सिल्लोड ) याचे शेखपूर शिवारात शेती आहे. येथे गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण सुनील लांजेवार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सशाने, सहायक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, पोलीस हवालदार मोरे, शिंदे, किशोर राजपूत, सूरज जोनवाल यांच्यासह सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सचिन क्षीरसागर, जमादार अनंत जोशी, यतीन कुलकर्णी, विष्णू कोल्हे, पोलीस शिपाई ज्ञानदेव ढाकणे, नागलोद यांनी गुरुवारी ( दि. ३१ ) सायंकाळी छापा मारला.
यावेळी पोलिसांनी २१ लाख १८ हजार रुपयांचा ३५३.५२ किलोग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक घोडे करत आहे.