कल्चर बदलले, गुन्हेगारी वाढली; जिल्ह्यात १२ दिवसाला खून तर पाच दिवसाला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 07:06 PM2021-09-20T19:06:23+5:302021-09-20T19:06:51+5:30

Crime in Aurangabad : शहराचे कल्चर बदलत चालले असून, त्यापाठोपाठ गुन्हेगारीदेखील विस्तारली जात आहे.

Culture changed, crime increased; Murder for 12 days and rape for 5 days in the district | कल्चर बदलले, गुन्हेगारी वाढली; जिल्ह्यात १२ दिवसाला खून तर पाच दिवसाला बलात्कार

कल्चर बदलले, गुन्हेगारी वाढली; जिल्ह्यात १२ दिवसाला खून तर पाच दिवसाला बलात्कार

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात खून, बलात्कार, फूस लावण्याचे प्रकार वाढले

- साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : शहराचे कल्चर बदलत चालले असून, त्यापाठोपाठ गुन्हेगारीदेखील विस्तारली जात आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत ४८ खून झाले. १३६ बलात्कार झाले आणि फूस लावून पळविल्याचे १३९ गुन्हे दाखल झाले. अलीकडे घडलेल्या गंभीर घटनांमुळे खळबळ उडाली होती.

तीन घटनांनी हादरले शहर ....
-घटना क्रमांक १
पूर्ववैमनस्यातून भरचौकात तरुणाची निर्घृण हत्या
दोन दिवसांपूर्वी मित्राला भांडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाची धारदार चाकू, दांडे, रॉड आणि फरशीचे तुकडे डोक्यात घालून तरुणाची गल्लीत फिल्मस्टाईल निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना हनुमान नगर गल्ली क्रमांक २ मध्ये रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. ही हत्या करणाऱ्या एका महिलेसह तिची दोन मुले आणि मित्रांना पोलिसांनी अटक केली. तेव्हा चौकात आणि गल्लीत उभे असलेल्या बघ्यांपैकी कोणीही तरुणाला वाचविण्यासाठी पुढे आले नव्हते. त्या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाल्याने मोठी चर्चा झाली होती.

घटना क्रमांक २....
जुन्या वादातून गुंड भुऱ्याने तरुणाला भोसकून खून केल्याची घटना संजय नगरात घडली होती. मंगेश माळोदे यास गुरुवारी रात्री फोन करून बोलविले. कोपऱ्यावर दोघांचा वाद झाला, भुऱ्यानेसोबत असलेला चाकू मंगेशला मारला, गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. जुन्या भांडणाचा राग धरून खुनाची घटना घडली. पोलीस फोर्स वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जाऊन आरोपीला काही तासांतच अटक केले. या घटनेने जिन्सी हद्दीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मैत्रीतून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर खुनात झाले.

घटना क्रमांक ३ ....
कांचनवाडी परिसरात दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या किरकोळ कारणावरून रविवारी रात्री महेश दिगंबर काकडे या युवकाचा खून झाला. मृत हा रक्ताच्या थारोळ्यात निचपित पडलेला होता. खून कोणी केला ही प्रथम शंका होती; परंतु गुन्हे शाखेच्या पथकाने विकास राहटवाड, संदीप मुळेकर यांना अटक केली. खून केल्यानंतर त्यांनी दारूसाठी महेशच्या खिशातून पैसे काढून दारू आणून ढोसली.

आकडेवारी सांगतेय...२०२० - २०२१
खून २०२० -----२३ , २०२१ -२५
बलात्कार २०२०- ७६/ २०२१ -६०,
फूस लावून पळविले २०२०- ९२/ २०२१- ४७

Web Title: Culture changed, crime increased; Murder for 12 days and rape for 5 days in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.