पोलीस आयुक्तालय हद्दीत ३१ जानेवारीपर्यंत जमावबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:06 AM2021-01-13T04:06:21+5:302021-01-13T04:06:21+5:30
अर्ज समाजकल्याण विभागास पाठवा औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे ३ डिसेंबरपासूनचे सर्व पात्र अनु. जाती, विजाभज, इमाव व ...
अर्ज समाजकल्याण विभागास पाठवा
औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे ३ डिसेंबरपासूनचे सर्व पात्र अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र विद्यार्थ्यांचे नवीन व नूतनीकरणाद्वारे केंद्र शासन शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेचे अर्ज भरून महाविद्यालयाद्वारे सामाजिक न्याय कार्यालयास मंजुरीसाठी पाठवावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त पी. जी. वाबळे यांनी केले आहे.
तूर खरेदीबाबत शेतकऱ्यांना आवाहन
औरंगाबाद : जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने तूर खरेदी सुरू करावयाची आहे. त्याकरिता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी तुरीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे, त्यांनी तूर विक्रीला आणल्यास त्यांना प्रतिक्विंटल ६ हजार रुपये दर मिळणार आहे. जिल्ह्यात औरंगाबाद (जाधववाडी), गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, फुलंब्री या खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी केले.
पाचवी, आठवीसाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास १ जानेवारी ते रविवार, ३१ जानेवारी २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरावेत, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.