सध्याचे सरकार म्हणजे दात पडलेला वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:05 AM2021-02-21T04:05:27+5:302021-02-21T04:05:27+5:30
वीरगाव : महाविकास आघाडीचे सरकार हे दात पडलेल्या वाघासारखे आहे. शेतकऱ्यांसाठी हे सरकार डोकेदुखी ठरत असल्याची टीका मनसेचे जिल्हाध्यक्ष ...
वीरगाव : महाविकास आघाडीचे सरकार हे दात पडलेल्या वाघासारखे आहे. शेतकऱ्यांसाठी हे सरकार डोकेदुखी ठरत असल्याची टीका मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी केले. शुक्रवारी वैजापूर तालुक्यातील लाडगावच्या महावितरण कार्यालयासमोर ते बोलत होते.
वीज बिल वसुलीसाठी खंडित केलेला शेतकऱ्यांचा शेतीपंपाचा विद्युत पुरवठा तत्काळ सुरू करावा, सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी आदी मागण्यांसाठी मनसेच्या वतीने लाडगाव येथील सबस्टेशनसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे, तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, उपाध्यक्ष नंदू हिरडे, गोरख तुपे, मनोज लेभे, अशोक चव्हाण, सरपंच संतोष घंगाळे, स्वप्निल श्रीवास्तव, संदीप वाळूज, गणेश बऱ्हाळकर, योगेश तुपे, पोपट रक्ताटे, सुभाष लहिरे यांची उपस्थिती होती. यावेळी महावितरणचे अधिकारी राहुल बडवे, सहायक अभियंता इशांत उबाळे, वीरेंद्र सोनवणे, वीरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार, दीपक बर्डे, बाबासाहेब धनुरे, प्रथमेश चंदेल, शिवनाथ सरोदे यांची उपस्थिती होती.
------
पोलिसांचा होता कडक बंदोबस्त
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लाडगावच्या महावितरण कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन केले जाणार होते. मात्र, घटनास्थळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे, तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.