संचालिक पुत्राची बाजार समितीत दबंगगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:04 AM2021-07-04T04:04:21+5:302021-07-04T04:04:21+5:30

लासूर स्टेशन : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिकाच्या पुत्राने समितीत दबंगगिरी केली. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराने त्यास दहा ...

Dabanggiri in the market committee of the director's son | संचालिक पुत्राची बाजार समितीत दबंगगिरी

संचालिक पुत्राची बाजार समितीत दबंगगिरी

googlenewsNext

लासूर स्टेशन : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिकाच्या पुत्राने समितीत दबंगगिरी केली. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराने त्यास दहा रुपयांची पावती दिल्याने, याचा संचालिकाच्या पुत्रास राग आल्याने त्याने थेट त्या कामगाराच्या श्रीमुखात लगावल्या. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून, लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने या वादावर पडदा टाकण्यात आला आहे.

बाजार समितीच्या मार्केटमध्ये शुक्रवारी कांदा लिलाव असल्याने, समितीच्या आवारात अनेक शेतकऱ्यांनी कांदा आणला होता. या दरम्यान, बाजार समिती संचालिकाचा पुत्र सचिन आव्हाळे यानेही कांदा विक्रीसाठी आणला होता. समितीच्या आवारात रोजंदारीवर काम करणाऱ्या अभिजीत नरोडे यांच्यासह इतर सहकारी आलेल्या कांद्याच्या गाड्या एका लाइनमध्ये लावत त्यांना दहा रुपयांची प्रवेश पावती देत होते. बाजार समितीच्या नियमानुसार ते सर्वांना पावत्या देत असताना, समितीच्या संचालिकाचा पुत्र सचिन यासही पावती देण्यात आली. मात्र, सचिन पैसे देत नसल्याने अभिजीत त्यास वारंवार पावतीचे पैसे मागत होता. या दरम्यान, सचिनने थेट अभिजीतच्या दोन, चार कानशिलात लगावल्याने काही काळ वाद निर्माण झाला होता. मात्र, तो संचालिकाचा पुत्र असल्याने बाजार समितीचे सभापती, संचालकांसह कर्मचाऱ्यांनी तातडीने मध्यस्थी करत, या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले. बाजार समितीच्या संचालिकेच्या पुत्राने केलेल्या दबंगगिरीची चर्चा दिवसभर सुरू होती.

Web Title: Dabanggiri in the market committee of the director's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.