लासूर स्टेशन येथे दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:22 AM2018-02-21T01:22:09+5:302018-02-21T01:22:40+5:30

येथील गणपती गल्लीत राहणा-या व्यापा-याच्या घरावर दरोडा पडल्याने ग्रामस्थांसह परिसरात घबराट निर्माण झाली आहे. सोमवारी मध्यरात्री दीड ते मंगळवारी पहाटे साडे तीन वाजेदरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी दाम्पत्याला घरात घुसून लोखंडी गजाने मारहाण करीत रोख रकमेसह सोन्या -चांदीच्या दागिने असा एकूण पाच लाख साठ हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला. पूर्वीच्या घटनांचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यात आज घडलेल्या या घटनेने व्यापारी वर्गात मोठी घबराट निर्माण झाली आहे. संतप्त व्यापाºयांनी सावंगी चौकात तब्बल तीन तासांहून अधिक वेळ रास्ता रोको आंदोलन करून पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Dacoity at Lasar Station | लासूर स्टेशन येथे दरोडा

लासूर स्टेशन येथे दरोडा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लासूर स्टेशन : येथील गणपती गल्लीत राहणा-या व्यापा-याच्या घरावर दरोडा पडल्याने ग्रामस्थांसह परिसरात घबराट निर्माण झाली आहे. सोमवारी मध्यरात्री दीड ते मंगळवारी पहाटे साडे तीन वाजेदरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी दाम्पत्याला घरात घुसून लोखंडी गजाने मारहाण करीत रोख रकमेसह सोन्या -चांदीच्या दागिने असा एकूण पाच लाख साठ हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला. पूर्वीच्या घटनांचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यात आज घडलेल्या या घटनेने व्यापारी वर्गात मोठी घबराट निर्माण झाली आहे. संतप्त व्यापाºयांनी सावंगी चौकात तब्बल तीन तासांहून अधिक वेळ रास्ता रोको आंदोलन करून पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील गणपती गल्लीत राहणारे विनोद जाजू हे पत्नी सुषमासह त्यांच्या घरात झोपलेले होते. दरम्यान, दोन अज्ञात दरोडेखोर मध्यरात्री किचन खोलीच्या खिडकीच्या साह्याने घरावर चढले व लोखंडी गजाच्या साह्याने जिन्यातील दरवाजा उघडून आत प्रवेश केला. प्रवेश करताच दरोडेखोरांनी जाजू दापम्त्याला लोखंडी गजाने मारहाण करून दहशत निर्माण केली. आहे ते सर्व घेऊन जा, परंतु मारहाण करू नका, अशी विनंती दरोडेखोरांना सुषमा यांनी केल्याने पुढील अनर्थ टळला.
गुन्ह्याची मालिका सुरुच
१९ जून रोजी इंदरचंद मुथा यांचे लुट प्रकरण, २७ सप्टेंबर रोजी राजूलबाई पाटणी, १३ नोव्हेंबरला केशरचंद जाजू यांच्या खुनाच्या घटनेने आधीाच दहशतीच्या वातावरणात असलेले व्यापारी आजच्या घटनेने आणखीनच घाबरले आहे. पूर्वीच्या गुन्ह्यांचा तपास लागेना, त्यात नवीन गुन्ह्यांची भर त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाºयांनी नागपूर -मुंबई महामार्गावरील सावंगी चौकात रास्ता रोको आंदोलन करून वरिष्ठ अधिकाºयांना चर्चेसाठी याठिकाणी बोलविण्याची मागणी लावून धरली होती. तसेच गुन्ह्याचा तपास तात्काळ करून सुरक्षा वाढविण्यासाठी पोलीस कर्मचाºयांची संख्या वाढविण्याची मागणी लावून धरली होती. हे आंदोलन तब्बल तीन तासाहून अधिक काळ सुरू होते. दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा तीन किलोमीटरहून अधिक लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
त्यानंतर सुमारे दोन तास दरोडेखोरांनी संपूर्ण घराची झडती घेत चार लाख साठ हजार रुपयांचे दागिने व रोख एक लाख असा एकूण पाच लाख साठ हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला. दरम्यान, जखमी विनोद जाजू यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेतकºयांना आवाज देऊन जाजू दाम्पत्याने स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर शिल्लेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक उज्वला वनकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह ठसे तज्ज्ञ व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.
सतत होत असलेल्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार प्रशांत बंब, माजी आमदार अण्णासाहेब माने, पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड, उपसरपंच गणेश व्यवहारे, बाजार समितीचे संचालक सुरेश जाधव यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, युवा कार्यकर्त्यांची पोलीस चौकीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने गुन्ह्याचा तपास पंधरा ते वीस दिवसांत लावण्याच्या दृष्टीने नियोजन करून सुरक्षा वाढविण्यासाठी पोलीस कर्मचाºयांची संख्या वाढवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
४सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन दरोडेखोर दिसत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शिल्लेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  Dacoity at Lasar Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.