नंबर प्लेटवर दिसणारे ‘दादा’, ‘भाऊ’ ‘नाना’ होणार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:52 PM2019-04-03T12:52:36+5:302019-04-03T12:57:51+5:30

१ एप्रिलनंतर उत्पादित वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक

'Dada', 'Bhau', 'Nana' will soon disappear on the number plate | नंबर प्लेटवर दिसणारे ‘दादा’, ‘भाऊ’ ‘नाना’ होणार हद्दपार

नंबर प्लेटवर दिसणारे ‘दादा’, ‘भाऊ’ ‘नाना’ होणार हद्दपार

googlenewsNext
ठळक मुद्देवाहनाच्या किमतीतच नंबर प्लेटचा खर्च समाविष्ट१ एप्रिलनंतर उत्पादित वाहनांवर हा नियम राहणार आहे.

औरंगाबाद : शासनाने १ एप्रिलनंतर उत्पादित वाहनांना आता हायसिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय लागू केला आहे. वाहन उत्पादकांकडून ही नंबर प्लेट देण्यात येणार आहे. वाहनाच्या किमतीतच त्याचा खर्च समाविष्ट राहणार असून, ग्राहकांना त्यासाठी वाहन वितरकांना वेगळी रक्कम द्यावी लागणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.

आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून या नंबर प्लेट लावण्यात येणार होत्या; परंतु हायसिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय रेंगाळत राहिला. यावर्षी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने हायसिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले; परंतु १ एप्रिलनंतर उत्पादित वाहनांवर हा नियम राहणार आहे. या नंबर प्लेटसाठी वेगळे कोणतेही शुल्क आकारू नये, असा निर्णयही घेण्यात आला आहे. हायसिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याची जबाबदारी ही संबंधित वाहन उत्पादक कंपन्यांवर सोपविण्यात आली आहे.

१ एप्रिलनंतर उत्पादित वाहनांची आवक आगामी १५ ते ३० दिवसांत होण्याची शक्यता आहे. संबंधित कंपनीकडून या नंबर प्लेटसाठी वेंडर नेमण्यात येणार आहेत. वाहन खरेदीनंतर आरटीओ कारवाई पूर्ण केल्याच्या तीन दिवसांनंतर ही हायसिक्युरिटी नंबर प्लेट मिळणार असल्याची माहिती वाहन वितरकांकडून देण्यात आली आहे.

हायसिक्युरिटी नंबर प्लेटचा वाहनधारकांना फायदा काय ? 
हायसिक्युरिटी नंबर प्लेटमध्ये विशेष चिप असणार आहे. या चिपमध्ये वाहनांच्या संबंधित माहिती दिली जाणार आहे. परिवहन विभागामध्ये वाहनांची नोंदणी केल्यानंतर ती माहितीही त्या चिपमध्ये राहील. या प्लेटचा पूर्ण पॅनल राहणार आहे. प्लेट बदलण्यासाठी पूर्ण पॅनल बदलावा लागणार आहे. त्यामुळे वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल. शिवाय नंबर पडल्याशिवाय नवे वाहन रस्त्यावर आणता येणार नाही. याबरोबर नंबर प्लेटवर दिसणारे ‘दादा’, ‘भाऊ’ ‘नाना’  हद्दपार होतील.

Web Title: 'Dada', 'Bhau', 'Nana' will soon disappear on the number plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.