दररोज दलालांच्या खिशात पाच हजाराचा मलिदा !

By Admin | Published: November 18, 2015 11:51 PM2015-11-18T23:51:44+5:302015-11-19T00:26:16+5:30

बीड : वाहन शोरूममध्ये नोंदणी करण्यासाठी गेल्यानंतर तेथील दलाल वाहनधारकांकडून २०० ते ३०० रूपये जास्तीचे उकळत असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे.

Daily five thousand maida in the pocket of the broker! | दररोज दलालांच्या खिशात पाच हजाराचा मलिदा !

दररोज दलालांच्या खिशात पाच हजाराचा मलिदा !

googlenewsNext


बीड : वाहन शोरूममध्ये नोंदणी करण्यासाठी गेल्यानंतर तेथील दलाल वाहनधारकांकडून २०० ते ३०० रूपये जास्तीचे उकळत असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. दिवसाकाठी हे दलाल ग्राहकांच्या खिशातून पाच हजार रूपयांपर्यंतची रक्कम वसुल करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरटोओ कार्यालयाकडून या दलालांशी आमचा संबंध नाही, असे सांगितले जात असले तरी त्यांच्यातील ‘अर्थ’पूर्ण संबंधाचीही चर्चा आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४२ अन्वये वाहन विक्रेत्यानेच नोंदणी करून देणे बंधनकारक आहे. दुचाकीच्या नोंदणीसाठी १६० रूपये तर चारचाकी वाहनाच्या नोंदणीसाठी २०० रूपये नियमाप्रमाणे लागतात. परंतु शोरूममध्ये गेल्यानंतर वाहनधारकाला दुपटीने अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
जास्तीचे पैसे दलाल उकळत असतानाही शोरूमच्या मालकाकडून याची दखल घेतली जात नसल्याचेच चित्र आहे. यासंदर्भात अनेक ग्राहकांनी समक्ष भेटून मालकांना यासंदर्भातील माहिती देऊनही पुन्हा याच दलालांच्या मार्फत काम केले जात असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)
शोरूममध्ये नोंदणी करण्यासाठी किती माणसे असावीत असा नियम नाही. जे खासगी व्यक्ती नोंदणीचे काम करतात, त्यांना शोरूमकडून ओळखपत्र दिले जाते. जास्तीचा एक रूपयाही घेतला जात नाही, असा खुलासा एका शोरूम म् ाालकाने ‘लोकमत’शी बोलताना केला.

Web Title: Daily five thousand maida in the pocket of the broker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.