२१५९ शाळांकडून मिळतोय दैनंदिन अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:02 AM2021-02-14T04:02:11+5:302021-02-14T04:02:11+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून झाले असून विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांची तपासणी, एकूण बाधित ...

Daily reports from 2159 schools | २१५९ शाळांकडून मिळतोय दैनंदिन अहवाल

२१५९ शाळांकडून मिळतोय दैनंदिन अहवाल

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून झाले असून विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांची तपासणी, एकूण बाधित असा दैनंदिन अहवाल आतापर्यंत २१६८ पैकी २१५९ शाळांकडून प्राप्त झाला आहे, तर उर्वरित ९ शाळांकडून माहिती उपलब्ध न झाल्याने त्या शाळा बंद असल्याचे शिक्षण विभागाच्या ११ फेब्रुवारीच्या दैनंदिन उपस्थिती अहवालात म्हटले आहे.

दैनंदिन मिळणाऱ्या अहवालावरून कमी उपस्थिती असलेल्या शाळांना उपस्थिती वाढवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या जात आहेत. त्यात अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी सुरू असून, त्यात आढळून येणाऱ्या त्रुटींची पूर्तता शाळांकडून करून घेतली जात आहे. ग्रामीण शाळांमध्ये पालकांच्या संमतीपत्रांची संख्या वाढत असून उपस्थितीही वाढत आहे. मात्र, अद्याप ५० टक्क्यांवर उपस्थिती न गेल्याने गळतीकडे वाटचाल सुरू झाल्याची भीती शाळांकडून व्यक्त होत आहे, सुमारे दहा महिने शाळेपासून दुरावलेले विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊन रमावेत यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

---

नऊ शाळा अद्याप सुरू नाहीत

पाचवी ते आठवीसाठी ७८०६ शिक्षक आहेत. त्यापैकी ७२७५ शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी झाली. त्यातून ६ शिक्षक पाॅझिटिव्ह आढळून आले, तर ६९१६ शिक्षकांनी आतापर्यंत अहवाल शाळांत सादर केले. गंगापूर १, कन्नड ४, खुलताबाद येथील चार शाळांकडून माहिती न मिळाल्याने त्या बंद असल्याचे अहवालात म्हटले आहे.

---

विद्यार्थी संख्या, पट, उपस्थिती, शिक्षकांची तपासणी त्याही लिंक भरल्या. शाळा सुरू झाल्यावर नियमित लिंक येत होत्या. आताही जेव्हा लिंक येतात. तेव्हा भरून पाठवतो. त्यात काही अडचणी येत नाहीत.

-अनिता व्याहाळकर, मुख्याध्यापिका, जि. प. प्रशाला आंबेलोहळ

--

शाळा व्यवस्थित सुरू झाल्या. जेव्हा माहिती मागवण्यासाठी लिंक येतात. त्या नियमित भरतो. मात्र, विद्यार्थी अनुपस्थिती नेहमीपेक्षा २० ते ३० टक्के अधिक आहे. हे प्रमाण गळतीच्या दिशेकडे दिसते. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची गोडी लावून शाळेत आणणे आव्हान बनले आहे.

-अनिल देशमुख, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला गणोरी

---

पाचवी ते आ‌ठवीच्या शाळांकडून वेळोवेळी ऑनलाइन लिंक पाठवून शाळांकडून माहिती मागवण्यात येते. शाळा ती माहिती भरून पाठवतात. उपस्थिती वाढत आहे. नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय या केंद्राच्या अखत्यारीतील शाळा शिक्षण विभागाला रिपोर्टिंग करत नाहीत. काही शाळा निवासी असल्याने बंद असून आतापर्यंत जिल्ह्यातील ९ शाळांकडून माहिती मिळालेली नाही.

-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

---

जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा : २१६८

जिल्ह्यात पाचवी ते आठवी सुरू झालेल्या शाळा : २१५९

विद्यार्थी संख्या : २,२०,७८४

उपस्थिती संख्या : १,१८,७४२

--

अहवाल देणाऱ्या तालुकानिहाय शाळा

गंगापूर : २६५

कन्नड : २९७

सिल्लोड : २६९

खुलताबाद : १३५

सोयगाव : ८८

पैठण : २७३

फुलंब्री : २३८

औरंगाबाद : २८८

वैजापूर : ३०६

Web Title: Daily reports from 2159 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.