कंटेनरच्या धडकेत कारचे नुकसान
By | Published: December 2, 2020 04:05 AM2020-12-02T04:05:43+5:302020-12-02T04:05:43+5:30
औरंगाबाद : छावणी नाक्याजवळ जकातीचे पैसे भरण्यासाठी थांबलेल्या कारला कंटेनर चालकाने धडक दिली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. ...
औरंगाबाद : छावणी नाक्याजवळ जकातीचे पैसे भरण्यासाठी थांबलेल्या कारला कंटेनर चालकाने धडक दिली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. हा अपघात २८ नोव्हेंबर रोजी रात्री झाला. मुसा शहा नवाब शहा (३५, रा. नवनाथनगर,जि. नगर)यांच्या तक्रारीवरुन छावणी पोलिसांनी कंटेनर (जीजे-०६-एएक्स-०७८२) चालक भुपेंद्रसिंग सॅमेल राम अवतार सॅमेल (रा. मुडिया खेड, जि. मोरेना, मध्यप्रदेश) याच्याविरुध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
=========
वीज चोरांविरुध्द गुन्हा
औरंगाबाद : वर्षभरापासून वीज चोरी करणाऱ्या महिला ग्राहकाविरुध्द महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली. तिसगाव येथील महिलेने १ हजार ७७६ युनिटची वीज चोरी केली.
जुन्या भांडणातून चाकूने वार
औरंगाबाद : जुन्या वादातून कामगारावर चाकू हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना शांतीपुरा येथे २९ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. विकी संजय नाडे (२१, रा. शांतीपुरा) याच्यावर आरोपी अश्विन प्रकाश निकाळजे याने चाकूने वार केला. याप्रकरणी नाडे यांच्या तक्रारीवरुन छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
=========
संशयितावर पोलिसांची कारवाई
औरंगाबाद : महावीर चौक पुलाजवळ अंधारात संशयितरित्या फिरताना भारत मुकेश वाकोडे (३५, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) याला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. पोलीस शिपाई अमोल सुखधणे यांनी त्याच्याविरुध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
=========
चंदनाचे झाड पळविले
औरंगाबाद : शक्तीनगर येथील तुकनगिरी मठाच्या आवारातून चंदनाचे झाड तस्करांनी तोडून नेल्याची घटना २४ नोव्हेंबरच्या रात्री घडली. जगदिशगिरी कांचनगिरी मेहता (५४) यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
.=========
पैशाच्या वादातून मारहाण
औरंगाबाद : पैशाच्या वादातून दोन आरोपींनी मजुराला मारहाण केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास रमानगर स्मशानभूमीत घडली. अरविंद रवींद्र भालेराव (१९. रा. बंजारा कॉलनी) यांना आरोपी आकाश वानखेडे आणि पवन सदाशिवे यांनी पैसे मागितले. भालेरावने पैसे देण्यास नकार देताच दोघांनी त्यांना रॉडने मारहाण केली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.==========
एमजीएम परिसरातून दुचाकी पळविली
औरंगाबाद : एमजीएम रुग्णालय परिसरात उभी असलेली दुचाकी २८ नोव्हेंबर रोजी रात्री चोरट्यांनी पळविली. याविषयी अफसर शहा कासीम शहा (४३, रा. जाधववाडी) यांनी दुचाकी (एमएच-२०-डीए-०४७६)पळविल्याची तक्रार सिडको पोलिस ठाण्यात नोंदविली.