उंदरांनी पोखरले मॉडेल रेल्वेस्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:04 AM2017-08-30T01:04:37+5:302017-08-30T01:04:37+5:30

मालधक्का आणि रेल्वेरुळांवर पडणाºया खाद्यपदार्थांमुळे मॉडेल रेल्वेस्टेशनवर सध्या उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे.

Damage by the rats in Model Railway Station | उंदरांनी पोखरले मॉडेल रेल्वेस्टेशन

उंदरांनी पोखरले मॉडेल रेल्वेस्टेशन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मालधक्का आणि रेल्वेरुळांवर पडणाºया खाद्यपदार्थांमुळे मॉडेल रेल्वेस्टेशनवर सध्या उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे. जागोजागी झालेल्या बिळांमुळे संपूर्ण रेल्वेस्टेशनच उंदरांनी पोखरल्याचे दिसते. रेल्वे प्रशासनाकडून हजारो रुपये खर्च करूनही उंदरांचा नायनाट होत नसल्याने प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
रेल्वेस्टेशनवर उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवरील रुळाखाली उंदरांनी बिळे केली आहेत. प्लॅटफॉर्मवर रेल्वेची वाट पाहत उभे प्रवासी रेल्वे रुळांवर उरलेले खाद्यपदार्थ फेकतात. अस्वच्छता पसरवितात. त्यामुळे उंदरांना सहज खाद्य मिळते. दुसरीकडे रेल्वेतील प्रवासीही उरलेले अन्न बोगीतच टाकतात. बोगींच्या स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष होते. रेल्वेस्टेशनमध्ये रेल्वे दाखल होताच उंदीर बिळाबाहेर पडतात. खाद्यपदार्थांच्या शोधात उंदीर बोगीत शिरत असावेत. त्यामुळे प्रवाशांबरोबर कर्मचारीही हैरान झाले आहेत. रेल्वेस्टेशन परिसरात मालधक्का आहे. या ठिकाणी मालगाडीद्वारे धान्याची ने-आण होते. चढ-उतर करताना मोठ्या प्रमाणात धान्य खाली पडते. यामुळेही उंदरांची संख्या वाढीला हातभार लागत आहे. रेल्वेस्टेशनवरील उंदीर मारण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून कंत्राट दिले जाते. कंत्राटदाराकडून विविध उपाययोजना करून उंदरांचा उच्छाद थांबविला जातो; परंतु आजघडीला रेल्वेस्टेशनवर उंदरांची परिस्थिती पाहता रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसते. यासंदर्भात स्थानिक अधिकाºयांनी बोलण्याचे टाळले. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क अधिकाºयांशी संपर्क साधला असता उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी कंत्राट दिले जाते. रेल्वेस्टेशनवरील सध्याच्या परिस्थितीची माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Damage by the rats in Model Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.