आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या दारी प्रशासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:55 AM2017-11-16T00:55:19+5:302017-11-16T00:55:29+5:30
नांदेड : जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या घरी भेट देवून प्रशासनाने कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्या. जिल्ह्यात २०१२ ते आॅक्टोबर अखेरपर्यंत ज्या शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत त्या शेतकºयांच्या कुटुंबियांची एकाच दिवशी भेटी घेवून त्यांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. आढाव्यानंतर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाकडून मदत केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकºयांना बसला आहे. सातत्याने पडणाºया दुष्काळामुळे शेतीच्या उत्पन्नातील अनियमितता व त्यामुळे झालेल्या कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांनी टोकाचा मार्ग स्वीकारत आत्महत्येला जवळ केले आहे. नांदेड जिल्ह्यातही २०१२ ते ३१ आॅक्टोबर २०१७ पर्यंत तब्बल ६९५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यातील ४७४ शेतकºयांना शासनाची मदत मिळाली आहे तर २१३ प्रकरणांमध्ये शासनाची मदत मिळू शकली नाही. जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या किनवट तालुक्यात आहेत.
१३६ शेतकºयांनी येथे आत्महत्या केल्या आहेत. त्या खालोखाल हदगाव तालुक्यात ८५, कंधार- ६८, हिमायतनगर-५४, लोहा-५०, भोकर-४२, माहूर-४१, मुखेड-३८, बिलोली-३६, नायगाव-३०, नांदेड-२७, उमरी-२५, अर्धापूर-१९, मुदखेड-१९, धर्माबाद-१४ आणि देगलूर तालुक्यात ११ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबामध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण होते. मयत शेतकºयांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. आत्महत्याग्रस्त शेतकºयांना शासनाच्या किती योजनांचा लाभ मिळाला आहे, याचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यात १५ नोव्हेंबर रोजी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांच्या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेण्यात आली. त्या कुटुंबांची काय परिस्थिती आहे, किती कुटुंब स्वबळावर उभी राहिली याची पाहणी करताना आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रशासन त्यांच्या दारापर्यंत बुधवारी पोहोचले होते. या भेटीत घेतलेल्या माहितीतून भविष्यात काही उपाययोजना करण्याचेही प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील ६९५ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या घरी भेटी देण्यासाठी ३९१ अधिकारी-कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामध्ये ७८ नोडल आॅफिसरचाही समावेश होता. या मोहिमेत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर शासकीय विभागातील अधिकाºयांनीदेखील शेतकरी कुटुंबियास भेट देवून अडचणी जाणून घेणे आवश्यक होते. प्रशासनाकडून बुधवारी आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांकडून शासनाची मदत मिळाली काय? आत्महत्या केलेल्या शेतकºयांची परिस्थिती, आत्महत्येचे कारण, कुटुंबियांची माहिती, शेतीची एकूण माहिती, कर्जविषयक माहिती, उत्पन्नाचे स्त्रोत आदी २२ मुद्यांची माहिती एकत्रित केली आहे.