गोरे वस्तीवर धाडसी दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:02 AM2021-07-02T04:02:16+5:302021-07-02T04:02:16+5:30

वैजापूर : तालुक्यातील देवगाव (शनी) शिवारातील गोरे वस्तीवर गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. दरवाजाचा कडीकोंडा तोडून कुटुंबातील ...

A daring robbery on a white settlement | गोरे वस्तीवर धाडसी दरोडा

गोरे वस्तीवर धाडसी दरोडा

googlenewsNext

वैजापूर : तालुक्यातील देवगाव (शनी) शिवारातील गोरे वस्तीवर गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. दरवाजाचा कडीकोंडा तोडून कुटुंबातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून ४ लाख २० हजार रुपये किमतीचे १५ तोळे सोने व ४५ हजार रुपये रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटून नेली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले झाले.

देवगाव (शनी) गावालगतच गोरे वस्ती असून या ठिकाणी भगवान गोरे हे कुटुंबीयांसमवेत राहतात. गुरुवारी पहाटेच्या सुमारास सर्व लोक गाढ झोपेत असताना गोरे यांचा घराचा समोरचा दरवाजा तोडून चार ते पाच दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. भगवान गोरे यांचा मुलगा व सून यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून कपाट उघडण्यास सांगितले. कपाट उघडल्यानंतर साहित्य उचकायला सुरुवात केली. आवाजामुळे दुसऱ्या खोलीत झोपलेल्या आई-वडिलांना आवाज आल्यावर त्यांच्या ग‌ळ्यावर चाकू लावला. त्यांच्याकडील ४ लाख २० हजार किंमतीचे १५ तोळ‌े सोने, व रोख रक्कम ४५ हजार असे मिळून पावणेपाच लाखांचा ऐवज लुटून नेला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती यांनी पाहणी केली. याप्रकरणी भगवान गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----

श्वानपथकाकडून पाहणी

वीरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय नरोडे हे फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यानंतर श्वानपथकाकडून तपासणी करण्यात आली. श्वानाने शेतातून माग काढल्यानंतर बॅटरी, डबा आढळून आला. त्याच रस्त्यावर दागिण्यांची रिकामी पर्स सापडली. चोरट्यांचा माग पिंपळगाव, मांजरी दिशेने गेला.

फोटो :

010721\img-20210701-wa0210.jpg

फोटो कॅप्शन शनि देवगाव दरोडा फोटो

Web Title: A daring robbery on a white settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.