अंधारीत खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:02 AM2021-05-12T04:02:12+5:302021-05-12T04:02:12+5:30
अंधारी : येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत ८ मे रोजी खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना ...
अंधारी : येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत ८ मे रोजी खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना मंडल कृषी अधिकारी प्रमोद डापके यांनी सोयाबीन उगवण शक्ती चाचणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
या कार्यक्रमात शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे नियोजन, जैविक बीज प्रक्रियाचे महत्त्व, माती परीक्षणानुसार द्यावयाची रासायनिक खतांची मात्रा, दहा टक्के रासायनिक खतांचा कमी वापर करण्यासंबंधी माहिती दिली. सोयाबीनच्या बियाणांसंबंधी शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले.
कृषी अधिकारी प्रमोद डापके, कृषी पर्यवेक्षक एकनाथ मुंढे, कृषी सहायक विठ्ठल गोराडे, पं. स. माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे, उपसरपंच राजू वानखेडे, पोलीसपाटील दिनेश खराते, कृषिमित्र पंडित पांडव, दिगांबर तायडे, रमेश तायडे, दिनकर तायडे, लक्ष्मण पांडव आदी शेतकरी हजर होते.