वैजापुरात माणुसकीचे दर्शन; एक लाखाची रक्कम केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:22 AM2020-12-11T04:22:19+5:302020-12-11T04:22:19+5:30
त्याचे घडले असे की, विस्तार अधिकारी गजेंद्र देशमुख हे औरंगाबादहून वैैजापूरकडे आपल्या चारचाकीने जात होते. त्यांच्यासोबत महालगाव येथील बाळू ...
त्याचे घडले असे की, विस्तार अधिकारी गजेंद्र देशमुख हे औरंगाबादहून वैैजापूरकडे आपल्या चारचाकीने जात होते. त्यांच्यासोबत महालगाव येथील बाळू मारुती चव्हाण हे वैजापूरला येत होते. त्यांच्या बॅगमधून कळत नकळत एक लाख रुपये देशमुख यांच्या कारमध्ये पडले. ही घटना दोघांच्याही लक्षात आली नाही. पैशाची गरज पडल्यानंतर मारुती यांनी बॅगमध्ये शोध घेतला; पण त्यात पैसे नसल्याचे आढळून आले. एक लाख रुपये नेमके कुठे पडले असतील याची चिंता त्यांना लागली. विस्तार अधिकारी देशमुख यांनी आपली कार थांबविली. कारमधील त्यांचे साहित्य घेताना त्यांना ही रक्कम आढळून आली. त्यांनी मारुती चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांना एक लाखाची रक्कम स्वाधीन केली. ही घटना वैजापूर पंचायत समिती कार्यालयात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी देशमुख यांचे अभिनंदन केले. या घटनेने पैशापेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे, याचा पुन्हा प्रत्यय आला.