मनातल्या दु:खावर फुंकर घालतेय दशक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:02 AM2021-05-23T04:02:17+5:302021-05-23T04:02:17+5:30
काही दिवसांपासून घाटावर येणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता, पैठण येथील प्रशासनाने हे सर्व धार्मिक विधी काही दिवसांसाठी बंद ठेवण्याच्या ...
काही दिवसांपासून घाटावर येणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता, पैठण येथील प्रशासनाने हे सर्व धार्मिक विधी काही दिवसांसाठी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता ज्यांचे दशक्रिया विधी लांबणीवर पडतील त्यांच्यासाठी आणि ज्या मृतांचे अस्थी मिळत नाहीत त्यांच्यासाठी पलाश विधी केला जातो, असे पैठण येथील पुरोहितांनी सांगितले.
चौकट :
घाटावर दशक्रिया करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. उलट अनेकांच्या मनात अग्नीडाग देता आला नाही, शेवटचे कार्य करता आले नाही, अशी खंत असते. त्यामुळे निदान दशक्रिया विधी तरी यथासांग करावे, जेणेकरून मृतात्म्यास शांती लाभेल, असा विचार करणारे बहुसंख्य आहेत. मृत व्यक्तीच्या मुलाला किंवा जो कोणी धार्मिक कार्य करणार आहे त्याला जर कोरोना झाला, तर मात्र लोक येण्याचे टाळत आहेत. पूर्वी दोन ते तीन दिवस सलग घाटावर येऊन विधी करावे लागायचे. आता कोरोनामुळे कमी दिवसांत विधी करून घेतले जात आहेत. फरक फक्त एवढा जाणवतो की, पूर्वी या विधीसाठी १० ते १५ लोक यायचे. आता मात्र मोजके २- ३ लोक येऊन विधी करीत आहेत.
- रवींद्र साळजोशी, पुरोहित