‘मिनी घाटी’ला तारीख पे तारीख

By Admin | Published: July 6, 2017 06:14 PM2017-07-06T18:14:49+5:302017-07-06T18:16:14+5:30

चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ला दोन वर्ष उलटूनही अद्याप सुरू होण्यास मुहूर्त मिळालेला नाही.

Date date to 'Mini Valley' | ‘मिनी घाटी’ला तारीख पे तारीख

‘मिनी घाटी’ला तारीख पे तारीख

googlenewsNext

संतोष हिरेमठ/ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद : चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे १८ महिन्यांत बांधकाम पूर्ण होऊन २०१५ मध्ये ते रुग्णसेवेत दाखल होणार होते. परंतु दोन वर्ष उलटूनही अद्याप रुग्णालय सुरू होण्यास मुहूर्त मिळालेला नाही. कधी आरोग्य विभागाने तर कधी राजकीय पदाधिकाºयांनी उद््घाटनाचा कालावधी जाहीर करण्याचा नुसता खेळ मांडला. परंतु ज्या कारणांसाठी हे रुग्णालय अडले ते वेळीच निकाली काढण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याने रुग्णसेवेला विलंब होत आहे.

गोरगरिबांची जीवन वाहिनी असलेल्या घाटी रुग्णालयावर गेल्या काही वर्षांत रुग्णसेवेचा प्रचंड भार वाढला आहे. त्यामुळे हा भार कमी होण्याच्या दृष्टीने चिकलठाणा येथे  २०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे (मिनी घाटी) २०१२ मध्ये काम सुरू झाले. मेडिसीन, प्रसूती, सर्जरी, अपघात असे विविध विभाग याठिकाणी असणार आहेत. रुग्णालयाच्या कामासाठी ३८ कोटी रुपये मंजूर झाले. परंतु निधी मिळण्यास वेळोवेळी खंड पडल्याने कामाची गती मंदावली. १८ महिन्यांत पूर्ण होणारे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. २.६७ कोटींसाठी बांधकाम विभागाने शेवटच्या टप्प्यातील किरकोळ कामे थांबविली आहेत. त्यामुळे मिनी घाटीचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरणही थांबल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रुग्णालयाच्या यंत्रसामुग्रीसाठी ११ कोटींचा प्रस्ताव आहे. ३ मे रोजी यंत्रसामुग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये विविध ५१ प्रकारच्या यंत्रसामुग्रीसाठी ही मान्यता देण्यात आली आहे. यंत्रसामुग्रीची आवश्यकता, मागणी यांची पडताळणी करून राज्यस्तरावर खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते. परंतु यंत्रसामुग्री मिळण्यास विलंब होत आहे. आतापर्यंत केवळ एक्स- रे मशीन प्राप्त झाले आहे. उर्वरित यंत्रसामुग्री, निधी कधी मिळणार याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीमुळेच २०० खाटांच्या रुग्णालयासाठी कुंभमेळ्यासाठी घेण्यात आलेल्या ५० खाटा घेण्याची वेळ आली. शिवाय आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत ६० लाखांचे उपचार साहित्य खरेदी करण्यात आले आहे. तेदेखील धूळखात पडून आहेत. 

नुसत्या घोषणा

कधी २०१५ तर कधी २०१६ मध्ये रुग्णालय सुरू होईल, असे सांगण्यात आले. केंद्र शासनाच्या निधीतून उभारण्यात येणाºया शिवाजीनगर येथील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन १ जून रोजी पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी महिनाभरात मिनी घाटी कार्यान्वित करण्याची घोषणा त्यांनी केली होती. परंतु या घोषणेलाही महिना उलटून गेला. परंतु रुग्णालय अद्यापही कार्यान्वित झाले नाही. त्यानंतर खा. खैरे यांनी या रुग्णालयाची पाहणी के ली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लवकरच उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी जाहीर के ले. यानंतर आता आरोग्य विभागाचे अधिकारी जुलैअखेर रुग्णालय सुरू होईल, असे म्हणत आहेत.

या कारणांनी रुग्णालयास विलंब

-बांधकामाच्या निधीत वेळोवेळी खंड.
-बांधकामाच्या शेवटच्या टप्प्यातील २.६७ कोटींची प्रतीक्षा.
-किरकोळ कामे अद्याप शिल्लक.
-११ कोटींची यंत्रसामुग्री मिळण्याची प्रतीक्षा.
-सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरणही थांबले.

पाठपुरावा सुरू


जिल्हा सामान्य रुग्णालय लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला जात आहे. महिनाभरात आवश्यक यंत्रसामुग्री मिळेल आणि रुग्णालय सुरू होईल. २.६७ कोटी रुपयांची प्रतीक्षा असल्याने काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. सुरुवातीला किमान १०० खाटा आणि बाह्यरुग्ण विभाग, अपघात, प्रसूती विभाग कार्यान्वित करण्यावर भर आहे.

- डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Date date to 'Mini Valley'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.