दवाखान्यातून डॉक्टरांसह कर्मचारी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:56 AM2017-07-27T00:56:35+5:302017-07-27T00:57:32+5:30
परभणी : ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी स्थापन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमधून डॉक्टरांसह कर्मचारीही गायब झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा वाºयावर पडल्याची बाब ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये निदर्शनास आली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी स्थापन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमधून डॉक्टरांसह कर्मचारीही गायब झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा वाºयावर पडल्याची बाब ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये निदर्शनास आली़
परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा सुरळीत सुरू आहे का? याची पाहणी करण्यासाठी बुधवारी जिल्हाभरातील प्रतिनिधींच्या माध्यमातून ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले़ प्रत्यक्ष आरोग्य केंद्रावर जावून पाहणी केली असता, अनेक ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचारी गायब असल्याचे दिसून आले़ त्यामुळे आरोग्य सेवेचा पार बोजवारा उडाला असल्याची स्थिती पहावयास मिळाली़ जिल्ह्यातील ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी बारा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३ ग्रामीण रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या तेव्हा बारा पैकी ५ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि ३ पैकी १ आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर्स गैरहजर असल्याचे दिसून आले़ जिंतूर तालुुक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसभर वैद्यकीय अधिकारी फिरकलेच नाहीत़ त्यामुळे दिवसभरातील संपूर्ण रुग्णांची तपासणी परिचारिकेमार्फतच पार पडली़ जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये मानव विकास मिशन अंतर्गत गरोदर मातांच्या तपासणीचे शिबीर स्त्रीरोग तज्ज्ञाअभावी झालेच नाही़ चारठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले़ तसेच पाथरी तालुक्यातील वाघाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातही डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णसेवा ठप्प होती़ गंगाखेड तालुक्यातील महातपुरीचे प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांअभावी बंद असल्याचे स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले़ एकंदर डॉक्टर आणि कर्मचारी गैरहजर राहत असल्याने परभणीतील ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडली आहे़
- सविस्तर वृत्त /४