डीबीए संघाची हायकोर्ट संघावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:59 AM2017-11-27T00:59:11+5:302017-11-27T00:59:18+5:30

गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राम-कमला औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत डीबीए संघाने हायकोर्ट संघावर ४ गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात मेघा इलेक्ट्रिकल संघाने आयुर्विमा संघावर विजय मिळवला. अनंता बडदे व संतोष हातोळे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.

 The DBA team beat the team | डीबीए संघाची हायकोर्ट संघावर मात

डीबीए संघाची हायकोर्ट संघावर मात

googlenewsNext

औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राम-कमला औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत डीबीए संघाने हायकोर्ट संघावर ४ गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात मेघा इलेक्ट्रिकल संघाने आयुर्विमा संघावर विजय मिळवला. अनंता बडदे व संतोष हातोळे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.
पहिल्या सामन्यात हायकोर्ट संघाने डीबीए अ संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १११ धावा केल्या. त्यांच्याकडून सुनील भोसलेने ३१ चेंडूंत ३७ व अमोल काकडेने २२ धावा केल्या. डीबीए संघाकडून दिनकर काळेने २० आणि ओमकार गुंजाळने २१ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद केले. मदन कटारे याने १ व संदीप देगावकरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात डीबीए अ संघाने १९.५ षटकांत ६ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून अनंता बडदे याने ४५ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५१, संतोष भारती याने १७ व मोहित घाणेकरने ११ धावा केल्या. हायकोर्ट संघाकडून देवानंद नांदेडकर व प्रल्हाद बाचाटे यांनी प्रत्येकी २, तर जावेद शेखने १ गडी बाद केला.
दुसºया सामन्यात मेघा इलेक्ट्रिकल्सने २० षटकांत ५ बाद १६२ धावा केल्या. त्यांच्याकडून सचिन हातोळे याने ४५ चेंडूंत ३ षटकार व ६ चौकारांसह नाबाद ५८ धावा केल्या. अशोक शिंदेने ३८ चेंडूंत ३ षटकार व ६ चौकारांसह ५६, तर नीलेश जैनने १६ धावा केल्या. आयुर्विमा संघाकडून संतोष धोटेने २ गडी बाद केले. इकबाल खान, जे. गंगवाल, महेश रेड्डी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात आयुर्विमा संघ ६ बाद १५७ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून ए. भारसाखळेने १८ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ३३ व एस. गणोरकरने ३२ धावांचे योगदान दिले. मेघना इलेक्ट्रिकल संघाकडून मयूर कांकरियाने २१ धावांत ३ गडी बाद केले.

Web Title:  The DBA team beat the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.