मृतदेहाला धर्मपत्नीची प्रतीक्षा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:19 AM2017-07-30T01:19:27+5:302017-07-30T01:19:27+5:30

औरंगाबाद : अंत्यविधीसाठी चार खांदेकरी घेऊन येते, असे घाटीतील डॉक्टरांना सांगून गेली खरी, मात्र पंधरा दिवस झाले तरी परतलीच नाही. पंधरा दिवसांपूर्वी मरण पावलेल्या एका व्यक्तीच्या मृतदेहाला पत्नीची प्रतीक्षा आहे

Dead body in waiting of wife | मृतदेहाला धर्मपत्नीची प्रतीक्षा...

मृतदेहाला धर्मपत्नीची प्रतीक्षा...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अंत्यविधीसाठी चार खांदेकरी घेऊन येते, असे घाटीतील डॉक्टरांना सांगून गेली खरी, मात्र पंधरा दिवस झाले तरी परतलीच नाही. पंधरा दिवसांपूर्वी मरण पावलेल्या एका व्यक्तीच्या मृतदेहाला पत्नीची प्रतीक्षा आहे. पंजाबची रहिवासी असलेली ही महिला न परतल्याने घाटीत शवागृहात ठेवलेल्या तिच्या पतीचे प्रेत कुजण्यास सुरुवात झाली आहे.
हृदयविकाराचा झटका आल्याने विजय अनिल (रा. वॉर्ड क्र. १३, किसनपुरा मोहल्ला, मोकेरिया, होशियारपूर, पंजाब) यांंना त्यांची पत्नी ममता यांनी पंधरा दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान १४ जुलै रोजी विजय यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांची पत्नी ममता यांनी विजय यांचे प्रेत घाटीतील शवागृहात ठेवले. त्यावेळी त्यांनी विजय यांच्या अत्यंविधीसाठी नातेवाईकांना घेऊन दुसºया दिवशीच येते, असे डॉक्टरांना सांगितले. १४ जुलै रोजी गेलेल्या ममता शवगृहाकडे फिरकल्याच नाहीत. ममता यांचा कोणताही संपर्क क्रमांकही डॉक्टरांकडे नाही. शवागृहातील वातानुकूलित यंत्रणा अधूनमधून खराब होत असते. विजयच्या मृत्यूला आज तब्बल पंधरा दिवस झाल्याने त्यांचे प्रेत कुजण्यास सुरुवात झाली आहे.
शवागृहात प्रेत कुजण्यामुळे दुर्गंधी येत असल्याचे पाहून डॉक्टरांनी घाटीचे वैद्यकीय सामाजसेवी अधीक्षक नीलेश कोतकर यांना या प्रेताच्या नातेवाईकांशी संपर्र्क साधून पुढील कार्यवाही करण्याचे सांगितले.

Web Title: Dead body in waiting of wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.