चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ला मार्चची ‘डेडलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:52 PM2018-01-28T23:52:38+5:302018-01-28T23:52:42+5:30

दोन वर्षांपासून रखडलेले चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय ७ मार्चपर्यंत पूर्णक्षमतेने कार्यान्वित होणार आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. आता या मुदतीत हे रुग्णालय नक्कीच कार्यान्वित होईल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कं देवाड यांनी दिली.

'Deadline' for 'Mini Valley' in Chikalthana | चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ला मार्चची ‘डेडलाईन’

चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ला मार्चची ‘डेडलाईन’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दोन वर्षांपासून रखडलेले चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय ७ मार्चपर्यंत पूर्णक्षमतेने कार्यान्वित होणार आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. आता या मुदतीत हे रुग्णालय नक्कीच कार्यान्वित होईल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कं देवाड यांनी दिली.
शहरात एका संस्थेतर्फे रविवारी आयोजित कार्यक्रमप्रसंगी डॉ. कंदेवाड यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ताबा घेतल्यानंतर हे रुग्णालय तात्काळ रुग्णसेवेत दाखल होणे अपेक्षित होते; परंतु यंत्रसामुग्रींअभावी त्यास खोडा बसला. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भव्य अशा इमारतीत कर्मचारी रुजू झाले आहेत. परंतु याठिकाणी रुग्णसेवा सुरू होण्याची दोन वर्षांपासून वाट बघावी लागत आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सामान्य रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी लक्ष घातल्याचे दिसते. ७ मार्चपर्यंत हे रुग्णालय सुरू करण्याची सूचना त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना केली आहे. त्यामुळे आता या मुदतीपर्यंत रुग्णालय सुरू होते का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
यंत्रसामुग्रींची प्रतीक्षाच
सामान्य रुग्णालयाच्या यंत्रसामुग्रीसाठी सुमारे ११ कोटींचा प्रस्ताव असून, ३ मे रोजी यंत्रसामुग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
यामध्ये विविध ५१ प्रकारच्या यंत्रसामुग्रीसाठी मान्यता देण्यात आली आहे; परंतु आतापर्यंत केवळ एक्स-रे मशीन प्राप्त झाली आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत ६० लाखांचे उपचार साहित्य खरेदी करण्यात आले. तर नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी घेण्यात आलेल्या ५० खाटा जिल्हा सामान्य रुग्णालयास मिळाल्या आहेत.
अद्यापही अनेक यंत्रसामुग्रींची प्रतीक्षाच क रावी लागत आहे. महिनाभरात यंत्रसामुग्री मिळेल, असे डॉ. कंदेवाड म्हणाले.

Web Title: 'Deadline' for 'Mini Valley' in Chikalthana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.