कुत्र्यांच्या हल्ल्यात लांडोर मृत्युमुखी

By Admin | Published: May 19, 2014 01:17 AM2014-05-19T01:17:50+5:302014-05-19T01:32:11+5:30

दावरवाडी : पिण्याच्या पाण्याच्या शोधात आलेल्या लांडोराचा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला.

The death of a dog in a dog attack | कुत्र्यांच्या हल्ल्यात लांडोर मृत्युमुखी

कुत्र्यांच्या हल्ल्यात लांडोर मृत्युमुखी

googlenewsNext

 दावरवाडी : पिण्याच्या पाण्याच्या शोधात आलेल्या लांडोराचा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे घडली. लांडोर शनिवारी रात्री पिण्याचे पाणी शोधत गावात आली होती. रात्रभर लांडोर वेड्या बाभळीत बसली. सकाळी बाहेर पडताच लांडोरीवर कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला व लचके तोडले. कुत्र्यांचा व लांडोराचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी लांडोरीची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली; परंतु जखमांमुळे लांडोरीचा मृत्यू झाला. पोलीस पाटील दिनकर एडके यांनी या घटनेची माहिती वन विभाग पैठणचे वनरक्षक बी.एम. बरडे यांना दिली. बरडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन लांडोर ताब्यात घेऊन पंचनामा केला. पंच म्हणून दिगंबर जानकर, प्रल्हाद भवरे, पो.पा. दिनकर एडके, बाबरभाई सय्यद आदी होते. शवविच्छेदन पाचोड येथील पशू दवाखान्यात डॉ. खंडारे यांनी केले. परिसरात पाणीटंचाई असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी जंगलातील पशू-पक्षी, प्राण्यांसाठी फुटक्या टाक्या, मडके, मोठे टायर कापून त्यामध्ये जागोजागी पाणी टाकून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, हौदात पाणी सोडावे, जेणेकरून मुक्या प्राण्यांचा जीव वाचविता येईल, असे आवाहन वनरक्षक बी.एन.बरडे यांनी केले.

Web Title: The death of a dog in a dog attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.