कॉपी पकडल्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेतलेल्या विद्यार्थ्याचा उपचारांदरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:52 AM2018-04-11T11:52:55+5:302018-04-11T11:59:51+5:30

शहरातील एम.आय.टी महाविद्यालयात बीएससी नर्सिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या सचिन वाघ या विद्यार्थ्याने मंगळवारी (दि. १० ) परीक्षेत कॉपी करताना पकडल्याने पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Death during the treatment of a student jumped from a college building | कॉपी पकडल्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेतलेल्या विद्यार्थ्याचा उपचारांदरम्यान मृत्यू

कॉपी पकडल्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेतलेल्या विद्यार्थ्याचा उपचारांदरम्यान मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसचिन हा एम.आय.टीच्या नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास न्यूट्रीशन बायोकेमेस्ट्रीची परीक्षा सुरु असताना त्याला कॉपी करताना पकडण्यात आले.

औरंगाबाद : शहरातील एम.आय.टी महाविद्यालयात बीएससी नर्सिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या सचिन वाघ या विद्यार्थ्याने मंगळवारी (दि. १० ) परीक्षेत कॉपी करताना पकडल्याने पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारसाठी दाखल करण्यात आले. मात्र आज पहाटे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.   

काय आहे प्रकरण :
हर्सूल येथे राहणारा सचिन हा एम.आय.टीच्या नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. सध्या सचिनच्या महाविद्यालयीन परीक्षा सुरु आहेत. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास न्यूट्रीशन बायोकेमेस्ट्रीची परीक्षा सुरु असताना त्याला कॉपी करताना पकडण्यात आले. पर्यवेक्षकाने त्याला पुढील कारवाईसाठी प्राचार्याकडे नेले. 

कारवाईने खचला अन् मारली उडी
कॉपी सापडल्याने महाविद्यालयाने केलेल्या कारवाईमुळे घरच्या मंडळींना कसे सामोरे जावे या द्वंद्वात अडकलेल्या सचिनने काही मिनिटांत महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील जिन्यातील काचेचे तावदान हटवून त्यातून खाली उडी घेतली. उडी मारण्यापूर्वी त्याने एमआयटीतच शिक्षण घेत असलेला मित्र सौरभ रणदिवे याला मोबाईलवरून संपर्क साधला; परंतु सौरभचीही परीक्षा चालू असल्याने त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे सचिनने घराजवळील मित्र शुभम राठोडला फोन करून, तो आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. 

पहा व्हिडिओ : विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न

सचिन व शुभम या दोन्ही मित्रांचे वारंवार फोन येत असल्याने सौरभने फोन उचलला अन् पेपर अर्ध्यावर सोडून त्याच्या कॉलेजच्या दिशेने धाव घेतली. समोरचे चित्र पाहून सौरभ थबकला.  महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून सचिन खिडकीतून उडी मारण्याच्या तयारीत होता. ‘नको नको असे नको करू नकोस,’ आरडाओरड सुरू होता. जिन्याने पळत जाऊन त्याला रोखेपर्यंत त्याने उडी मारली होती. सौरभने अन्य मित्रांच्या मदतीने त्वरित दवाखान्यात दाखल केले. येथेच उपचारांदरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. 

शांत व हुशार विद्यार्थी...
सचिनचे वडील बस कंडक्टर असून, ते पुणे येथे नोकरीला आहेत. नवनाथनगरात मोठी बहीण,भाऊ, आई राहतात. दडपणामुळेच हा प्रकार त्याने केला असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Web Title: Death during the treatment of a student jumped from a college building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.