वाळूखाली दबल्याने मजुराचा मृत्यू

By Admin | Published: February 22, 2016 12:24 AM2016-02-22T00:24:35+5:302016-02-22T00:38:35+5:30

आनाळा/आंबी : अवैधरित्या वाळूचा उपसा करून ट्रॅक्टर भरणाऱ्या चार मजुरांच्या अंगावर वाळूची धडी पडली़ या घटनेत वाळूखाली दबलेले गेलेले तीन मजूर बाहेर निघाले़ मात्र

The death of a laborer due to sand suppression | वाळूखाली दबल्याने मजुराचा मृत्यू

वाळूखाली दबल्याने मजुराचा मृत्यू

googlenewsNext


आनाळा/आंबी : अवैधरित्या वाळूचा उपसा करून ट्रॅक्टर भरणाऱ्या चार मजुरांच्या अंगावर वाळूची धडी पडली़ या घटनेत वाळूखाली दबलेले गेलेले तीन मजूर बाहेर निघाले़ मात्र, एकाचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेळगाव शिवारातील खैरी नदीच्या पात्रात घडली असून, या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेळगाव येथील गणेश बळीराम वाघमारे यांचे ट्रॅक्टर (क्ऱएम़एच़२५- बी़ ४४७७) शनिवारी रात्री वाळू भरण्यासाठी चार मजूरांसह खैरी नदीच्या पात्रात गेले होते़ खैरी नदीपात्रातील एका खड्ड्यात वाळू भरत असताना अचानक वाळूची धडी त्या मजुरांच्या अंगावर पडली़ यावेळी तीन मजूर कसेबसे बाहेर पडले़ मात्र, दीपक अंकुश लांडगे (वय-३८) हा मजूर या ढिगाऱ्याखाली अडकला़ इतरांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करूनही त्यात यश आले नाही़ वाळूखाली बराच काळ दबले गेल्याने दीपक लांडगे यांचा मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रविवारी सकाळी मोठी गर्दी झाली होती़ घटनास्थळाचा मंडळ अधिकारी आटुळे, तलाठी वाय़एस़जगताप यांनी पंचनामा केला़ या बाबत गणेश बळीराम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीवरून अंबी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास जी़एस़भिसे हे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: The death of a laborer due to sand suppression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.