अन्न पाण्याविना बिबट्याचा मृत्यू, सिरसाळ्याच्या डोंगरात आढळले मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 09:10 PM2018-05-18T21:10:05+5:302018-05-18T21:10:17+5:30
अन्न पाण्याच्या शोधार्थ डोंगरात भटकंती करणाऱ्या दीड वर्षाच्या बिबट्याचा तडफडून मृत्यू झाला
सिल्लोड : अन्न पाण्याच्या शोधार्थ डोंगरात भटकंती करणाऱ्या दीड वर्षाच्या बिबट्याचा तडफडून मृत्यू झाला.. ही घटना सिल्लोड तालुक्यातील सिरसाळ्याच्या डोंगरात घडली तब्बल पांच दिवस बिबट्याचे प्रेत डोंगरात पडून होते.. एका गुराख्याने वनविभागास माहिती दिल्याने गुरुवारी संध्याकाळी ही घटना समोर आली. रात्री डोंगरात वनकर्मचाऱ्यानी पहारा देऊन शुक्रवारी सकाळी त्याचे जागेवर शवविच्छेदन करून अंतिम संस्कार केले. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शिरसाळा गावापासून 2 किलिमिटर अंतरावर असलेल्या खोल दरीत या बिबट्याचे प्रेत एका गुरख्याला गुरुवारी दिसले त्या नंतर त्याने सोयगाव वन विभागास माहिती दिली. पण तेथील काही कर्मचारी जळगाव,तर काही औरंगाबाद येथे गेले असल्याने याची माहिती गुरुवारी लपविण्यात आली. सिल्लोड चे वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर दहिवाल, अजिंठ्याचे मागधरे, सोयगावचे शिवाजी काळे, वनपाल, वनरक्षक यांनी शुक्रवारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्या नंतर शवविच्छेदन करून बिबट्याचे अंतिम संस्कार करण्यात आले.
शिरसाळा हे गाव सिल्लोड तालुक्यात येत असले तरी याला वनविभाग सोयगाव येते... सर्व गैर सोईनी नटलेल्ल्या या सोयगावात अधिकारी कर्मचारी औरंगाबाद,जळगाव येथून अपडाऊन करतात... जंगलात वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नाही..सर्व पाणवठे कोरडे पडले आहे.. कागदावर त्या पांनवठ्यात पाणी सोडल्या जाते... डोंगरात वृक्ष तोड वाढली आहे. मानवी हस्तक्षेप वाढला आहे.6 दिवसांपूर्वी बिबट्या डोंगरात मरून पडलेला वन कर्मचाऱ्याना दिसला नाही.. याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. यामुळे वनविभागाचे जंगलात किती लक्ष आहे हे दिसून येते.कर्मचाऱ्यानी डोंगरात पेट्रोलिंग केली असती तर सहा दिवसांपूर्वी ही घटना उघड झाली असती.
अन्न पाण्यामुळेच मृत्यू....
ही तर भूक बळीच आहे... सहा दिवसात बिबट्याचे प्रेत कुजले होते.. त्याची चामडी गळून पडत होती. त्याच्या पोटात अन्ना चा एक कण नव्हता.. पाणी नव्हते.. यामुळे त्याचा मृत्यू अन्न पाण्यामुळेच झाला आहे.
-डॉ. धनंजय महाजन पशुवैद्यकीय अधिकारी घाटनांद्रा.
मेल्यानंतर ही हेळसांड
जिवंत पणी त्या बिबट्याला डोंगरात अन्न पाणी मिळाळे नाही... त्यासाठी त्याला भटकंती करावी लागली... मेल्यावर सुद्धा 6 दिवस त्याकडे कुणी पाहिले नाही... त्याचे प्रेत अक्षरशा कुजले होते.. यामुळे निसर्ग प्रेमी संताप व्यक्त करीत आहे. दोषी कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.