मंगलनाथ महाराजांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:04 AM2021-04-15T04:04:32+5:302021-04-15T04:04:32+5:30
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मिटमिटा येथील आश्रमात त्यांचे वास्तव्य असायचे. त्यांनी नवनाथ परंपरेचा ...
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मिटमिटा येथील आश्रमात त्यांचे वास्तव्य असायचे. त्यांनी नवनाथ परंपरेचा प्रचार-प्रसार कार्यात वाहून घेतले होते. मराठी साहित्य आणि संत-वाङ्मयात एम.ए. केले होते. महाराजांना पुण्यातील लोकमान्य टिळक विद्यापीठाने डी.लिट. पदवीने सन्मानित केले होते. त्यांचा देश-विदेशात मोठा भक्त परिवार आहे. महाराजांच्या अचानक जाण्याने नाथ संप्रदायावर मोठी शोककळा पसरली आहे. ते उत्तर प्रदेशातील चित्रकूट करवी येथील अतिप्राचीन नाथगादीचे १९४६ पासून ते आतापर्यंत अधिपती होते.
द्वारकापीठाच्या श्री शंकाराचार्यांनी त्यांना विधिवत नाथपीठावर आरूढ केले होते व त्यांना विमलानंद हे नाव दिले. तेव्हा त्यांना योगेश्वरानंद या पदवीने विभूषित केले होते. आज त्यांचे पार्थिव स्वामी मच्छिंद्रनाथ अध्यात्म मंदिरात आणण्यात आले होते. तिथे कोविडच्या नियमांचे पालन करत मोजक्या शिष्यांनीच त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यानंतर सायंकाळी प्रतापनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर नाथ परंपरेनुसार अग्निसंस्कार करण्यात आले.