मनोरुग्ण महिलेची मरण यातनेतून केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:05 AM2021-09-25T04:05:27+5:302021-09-25T04:05:27+5:30
सिल्लोड : शिवना परिसरात एक २८ वर्षीय युवती मानसिक आजाराने ग्रस्त झाल्याने रात्रभर कुठेही रस्त्यावर भटकून अंगावरील कपडे ...
सिल्लोड : शिवना परिसरात एक २८ वर्षीय युवती मानसिक आजाराने ग्रस्त झाल्याने रात्रभर कुठेही रस्त्यावर भटकून अंगावरील कपडे फाडत होती. जमिनीवर डाेके आपटत होती. ही बाब अजिंठा पोलीस ठाण्याचे सपोनि अजित विसपुते यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी समाजसेवी संघटनेच्या मदतीने तिला पुणे येथील मनोरुग्णालयात पाठवून तिची या मरण यातनेतून सुटका केली आहे.
अजिंठा पोलीस ठाण्याचे सपोनि अजित विसपुते शिवना परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक मनोरुग्ण युवती रात्री एकटीच रस्त्याने फिरताना दिसली. ती क्षणात स्वत:चे कपडे फाडत होती, तर कधी जमिनीवर डोके आपटत होती. विसपुते यांनी सदर युवतीची माहिती काढली, तेव्हा तिची आई हयात नाही तर वडिलांनाही अर्धांगवायू झाल्याचे समजले. घरची परिस्थिती बिकट असल्याने काही दिवसांपूर्वीच ती मानसिक आजाराने ग्रस्त झाली होती. रात्री अपरात्री ती तरुणी रस्त्यावर एकटी फिरत असल्याने तिच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. उनाड मुले तिचा गैरफायदा घेऊ शकतात. यामुळे सपोनि विसपुते यांनी तिला शिवना गावकऱ्यांच्या मदतीने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला पुणे येथील येरवडा मनोरुग्ण सेंटरमध्ये भरती करण्याचा सल्ला दिला. वकिलामार्फत कोर्टात याचिका दाखल करुन न्यायालयामार्फत तिला मनोरुग्णालयात उपचारासाठी नेण्याची कोर्ट ऑर्डर करून घेत तिला पुणे येथील रुग्णालयात दाखल केले. ही प्रक्रिया म्हणावी तितकी सोपी नव्हती, तरीही पोलिसांनी माणुसकीच्या नात्याने ती पूर्ण केली व या तरुणीची मरण यातनेतून तसेच वासनांधांच्या नजरेपासून तिची सुटका केली.
चौकट
या सामाजिक कार्यासाठी यांनी केली मदत
या तरुणीला मनोरुग्णालयात पाठविण्यासाठी सपोनि अजित विसपुते यांच्यासह नीलेश शिरसकर, अजिनाथ शेकडे, बाबासाहेब चव्हाण, माणुसकी समूहाचे सुमित पंडित, ग्रामस्थ सलमान, डॉ. शेख जफर, अमोल चितळे, आरेफ कुरेशी, इमरान कुरेशी, मंजूर खान, जाकेर पठाण, डॉ. रंजना प्रशांत दंदे, फैमिदा खान, पूजा पंडित आदींनी परिश्रम घेतले.
फोटो :
240921\img_20210924_184019.jpg
क्याप्शन
1) अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजीत विसपुते याचा पासपोर्ट फोटो...
2) त्या मनोरुग युवतीला उपचार साठी नेताना पोलीस व समाज सेवक दिसत आहे.