केबलच्या दुरुस्तीसाठी मॅन होलमध्ये उरतलेल्या कामगाराचा मृत्यू
By राम शिनगारे | Published: September 18, 2022 03:41 PM2022-09-18T15:41:30+5:302022-09-18T15:41:46+5:30
चिकलठाणा एमआयडीसीमधील एसटी वर्क शॉपच्या परिसरात बीएसएनएल ऑफिसच्या जवळ केबलचे काम करण्यासाठी मॅन होलमध्ये उतरलेल्या कामगाराचा गुदमरुन मृत्यू झाल्याची दुपारी २ वाजेच्या सुमारास घटना घडली आहे.
औरंगाबाद :
चिकलठाणा एमआयडीसीमधील एसटी वर्क शॉपच्या परिसरात बीएसएनएल ऑफिसच्या जवळ केबलचे काम करण्यासाठी मॅन होलमध्ये उतरलेल्या कामगाराचा गुदमरुन मृत्यू झाल्याची दुपारी २ वाजेच्या सुमारास घटना घडली आहे.
मधुकर किर्तिकर असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. मॅन होलमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस असल्यामुळे कामगार आतमध्ये उतरल्यानंतर गुदमरून गेला. वर उभे असलेल्यांना आरडाओरड केली मात्र, आतमध्ये गॅस असल्यामुळे कोणीही उतरले नाही. शेवटी अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी मॅन होलमध्ये उतरुन बेशुद्ध पडलेल्या मधुकर किर्तीकर यांना बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी तपासून मृत घोषीत केले आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.