विष प्राशन केलेल्या ‘वैद्यकीय’च्या विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:05 AM2021-01-03T04:05:01+5:302021-01-03T04:05:01+5:30

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्याने विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना शहरात ...

Death of a poisonous medical student | विष प्राशन केलेल्या ‘वैद्यकीय’च्या विद्यार्थ्याचा मृत्यू

विष प्राशन केलेल्या ‘वैद्यकीय’च्या विद्यार्थ्याचा मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्याने विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली. दरम्यान, खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. यश नरसिंगराव गंगापूरकर (वय २५) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

यश गंगापूरकर हा ब्राह्मण गल्ली बेगमपुरा येथे किरायाच्या खोलीत आई, बहिणीसोबत राहत होता. २५ डिसेंबर रोजी त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. घाटी दवाखान्यात त्याला उपचारासाठी दाखल केले होते. नंतर अधिक उपचारासाठी त्यास गारखेडा परिसरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. परंतु, शुक्रवारी प्रकृती अधिक बिघडली आणि रात्री त्याची प्राणज्योत मालवली. आत्महत्येचे कारण कळले नाही. शवविच्छेदनानंतर आई, वडील, चुलता, नातेवाईक मृतदेह नांदेडकडे घेऊन गेले.

त्याने विष आणले कोठून?

हुशार विद्यार्थी असताना त्याने हे पाऊल का उचलले, विष विकत आणले की, शासकीय रुग्णालयातूनच घेतले. कारण, काय अशा विविध प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत. यापूर्वीही एका डॉक्टराने सलाईन लावून त्यातून विष घेऊन आत्महत्या केली होती. आता ही दुसरी घटना समोर आली आहे. बेगमपुरा पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, अधिक तपास पोहेकॉ. राजकुमार जाधव हे करीत आहेत.

(फोटो)

Web Title: Death of a poisonous medical student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.