भाजलेल्या चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:52 PM2019-08-24T23:52:07+5:302019-08-24T23:52:18+5:30
घरात खेळता-खेळता गरम पाण्याच्या पातेल्यात पडून गंभीर भाजलेल्या वडगाव कोल्हाटीत येथील साडेतीन वर्षीय चिमुकलीचा शनिवारी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
वाळूज महानगर : घरात खेळता-खेळता गरम पाण्याच्या पातेल्यात पडून गंभीर भाजलेल्या वडगाव कोल्हाटीत येथील साडेतीन वर्षीय चिमुकलीचा शनिवारी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. दिप्ती रमाकांत अहिरवाल असे चिमुकलीचे नाव आहे.
रमाकांत अहिरवाल हे पत्नी नेहा व तीन मुलींसह वडगाव कोल्हाटी येथे राहतात. त्यांचा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय आहे. अहिरवाल कुटुंबियांनी शुक्रवारी गोकुळ आष्टमीनिमित्त घरात गोड पदार्थ बनविण्याचा निर्णय घेतला होता. हा पदार्थ तयार करण्यासाठी नेहा यांनी चुलीवर पाणी गरत करुन ते पातेल्यात ठेवले.
सकाळी १० वाजेच्या सुमारास दिप्तीचा तोल जाऊन ती या गरम पाण्याच्या पातेल्यात पडली. तिला उपचारासाठी बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने तिला घाटी रुग्णालयात दाखल केले.
शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दिप्ती अहिरवाल हिची प्राणज्योत मालविली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.