बेशुद्ध पडलेल्या इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:07 AM2021-01-13T04:07:01+5:302021-01-13T04:07:01+5:30
------------------------- मच्छिंद्र भालेराव यांचे निधन वाळूज महानगर : मच्छिंद्र रंगनाथ भालेराव (५९, रा. अविनाश कॉलनी, वाळूज) यांचे दीर्घ आजाराने ...
-------------------------
मच्छिंद्र भालेराव यांचे निधन
वाळूज महानगर : मच्छिंद्र रंगनाथ भालेराव (५९, रा. अविनाश कॉलनी, वाळूज) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी (दि.९) राहत्या घरी निधन झाले. येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सून असा परिवार आहे.
फोटो क्रमांक-मच्छिंद्र भालेराव
---------------------
पतीची पत्नीला मारहाण
वाळूज महानगर : दारूच्या नशेत पत्नीस शिवीगाळ करून लाकडी दांड्याने तिचे डोके फोडणाऱ्या पतीविरुद्ध एमआयडीसी वाळज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता विजय मंजुळे (३८, रा. तीसगाव परिसर) या शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घरी असताना त्यांचे पती विजय मंजुळे यांनी दारूच्या नशेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या भांडणात विजय मंजुळे याने पत्नी सुनीता हीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचे डोके फोडले. याप्रकरणी पती विजय मंजुळे याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------------------
वाळूज येथून दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : वाळूज येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख शाहेद हारुण (रा.अजवानगर, वाळूज) यांनी शनिवार (दि.९) रात्री दुचाकी (एम.एच.२०, सी.जे.४२१७) घरासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्यांने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार शेख सलीम हे करीत आहेत.
----------------------
एफडीसी चौकात धोकादायक खड्डा
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील एफडीसी चौकात मोठा खड्डा पडला असून, अपघाताचा धोका वाढला आहे. रांजणगाव फाट्यावरून बजाजनगरकडे येणाऱ्या रस्त्यावरील या चौकात पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताच्या घटना वाढला आहे. या रस्त्यावर सतत वाहनाची वर्दळ राहत असून, खड्ड्यात वाहने आदळून वाहनाचे नुकसानही होत आहे. हा धोकादायक खड्डा बुजविण्यासाठी एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वाहनधारकात असंतोषाचे वातावरण आहे.
----------------------------