रांजणगावात बेशुद्ध पडलेल्या तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:02 AM2021-02-27T04:02:51+5:302021-02-27T04:02:51+5:30
----------------------- बजाजनगरात दुचाकी लंपास वाळूज महानगर : बजाजनगरातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुध्द वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
-----------------------
बजाजनगरात दुचाकी लंपास
वाळूज महानगर : बजाजनगरातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुध्द वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल भारत बोधे यांनी १५ फेब्रुवारीला बजाजनगरातील गरुड झेप अकॅडमीसमोर दुचाकी (क्र. एम.एच.२८, ए.एम.१६६७) उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरुन नेली.
---------------------
अतिमद्य प्राशनाने वृध्दाचा मृत्यू
वाळूज महानगर : अतिमद्य प्राशन केल्याने ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास तिसगावच्या काचीपुरा शिवारात घडली. प्रल्हाद मारोती गोदमले यांनी गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अतिमद्य प्राशन केल्याने राहत्या घरी बेशुद्ध पडले होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.
-------------------------
कारच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
वाळूज महानगर : भरधाव व निष्काळजीपणे कार चालवून दुचाकीस्वारास जखमी करणाऱ्या कारचालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदारनाथ विलास कदम (वय ३०) हे बुधवार (दि.२४) दुचाकीने बजाजनगरातून चालले होते. हायटेक कॉलेजसमोर राँग साईडने आलेल्या कार (एम.एच.२०, सी.एस.८५५९) चालकाने केदारनाथ कदम यांच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाला. या अपघातात केदारनाथ कदम जखमी झाले असून फरार कारचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
-----------------------
वाळूज येथून दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : वाळूज येथून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील मंगलसिंग पाटील यांनी २४ फेब्रुवारी रोजी रात्री घरासमोर दुचाकी (क्र. एम.एच.२०, ई.क्यु.१२५८) उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.
-----------------------