घाटीतील ओपीडी समोरचा मलबा हटवला
By | Published: December 5, 2020 04:06 AM2020-12-05T04:06:41+5:302020-12-05T04:06:41+5:30
-- औषधी खरेदीसाठी हाफकीनला ७.५० कोटी वर्ग औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला सर्जिकल साहित्य व औषधी खरेदीसाठी राज्य शासनाकडून नॉन ...
--
औषधी खरेदीसाठी हाफकीनला ७.५० कोटी वर्ग
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला सर्जिकल साहित्य व औषधी खरेदीसाठी राज्य शासनाकडून नॉन प्लॅन अनुदानातून साडेसात कोटी रुपये प्राप्त झाले होते. हा निधी हाफकीन महामंडळाला वर्ग करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली. त्यामुळे घाटीतील नॉन कोविड रुग्णसेवेसाठी उद्भवलेली औषधी तुटवड्याची परिस्थिती निवळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
--
घाटीतील अनधिकृत रहिवाशांची पडताळणी
औरंगाबाद : घाटी परिसरातील कर्मचारी व अधिकारी निवासस्थानाच्या सहा इमारतींची पडताळणी पूर्ण झाली. उर्वरित इमारतीच्या रहिवाशांची पडताळणी लवकरच पूर्ण होऊन पुढील आठवड्यात अनधिकृत रहिवाशांची यादी जिल्हाधिकारी यांना सुपुर्द केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यासंबंधी कार्यवाही होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली. निवासस्थान समितीच्या बैठकीला डॉ. मारुती लिंगायत, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. गजानन सुरवाडे यांची उपस्थिती होती.