कर्ज ठरले दोघांचा कर्दनकाळ
By | Published: December 5, 2020 04:05 AM2020-12-05T04:05:04+5:302020-12-05T04:05:04+5:30
वैजापूर : कर्जबाजारीपणाला कंटाळून मुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, तर मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या जाण्याचे दु:ख सहन ...
वैजापूर : कर्जबाजारीपणाला कंटाळून मुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, तर मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या जाण्याचे दु:ख सहन न झाल्याने वडिलांनीही विष प्राशन करून विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपविली. काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना घडली ती गोयगाव, ता. वैजापूर येथे. मात्र, बाप अन् लेकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरले कर्ज नावाचे प्रकरण. त्या दोघांमध्ये कर्जावरून कायम भांडण असल्याचे समोर आले आहे. मुलगा सुरेश मोटे हा काही दिवसांपासून दु:खी होता. अतिवृष्टीमुळे हातचे पीकही गेले. कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता त्याला कायम सतावत होती. त्यात वडिलांच्या हाताने काढलेले कर्जदेखील मला फेडायचे. यावरून घरात तणावाचे वातावरण होते. अखेर कर्जापायीच आधी मुलाने अन् नंतर मुलाने आयुष्य संपविले.