दुष्काळामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Published: December 30, 2014 12:52 AM2014-12-30T00:52:11+5:302014-12-30T01:19:17+5:30
अजिंठा : दुष्काळ व नापिकीला कंटाळून तालुक्यातील आणखी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना हट्टी येथे घडली
अजिंठा : दुष्काळ व नापिकीला कंटाळून तालुक्यातील आणखी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना हट्टी येथे घडली. विषारी पदार्थ प्राशन केलेल्या हट्टी, ता.सिल्लोड येथील काशीनाथ जयाजी जरारे (४५) या कर्जबाजारी शेतकऱ्याची घाटी रुग्णालयात रविवारी प्राणज्योत मालवली. काशीनाथ जयाजी जरारे यांनी सततच्या नापिकीला कंटाळून १९ रोजी विष प्राशन केले होते. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार जरारे यांच्याकडे बचत गट, कृषी दुकान व खाजगी कर्ज होते. त्यांच्या पार्थिवावर हट्टी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जरारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सपोनि शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार प्रकाश खरात, पो.हे.कॉ.अजित शेकडे करीत आहेत.