समाजकल्याण निरीक्षक, कोषागार अधिकाºयामध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 12:57 AM2017-08-04T00:57:56+5:302017-08-04T00:58:10+5:30
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या एका बिलात त्रुटी काढली. ती विचारण्यासाठी गेलेल्या समाजकल्याणचे निरीक्षक व कोषागार अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या एका बिलात त्रुटी काढली. ती विचारण्यासाठी गेलेल्या समाजकल्याणचे निरीक्षक व कोषागार अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
मागील काही दिवसांपासून कोषागार कार्यालय व सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागात वेगवेगळ्या कारणावरून वाद सुरू आहेत. गतमहिन्यात शिष्यवृत्तीचे बिल पास न केल्यामुळे वाद झाला होता. आता पुन्हा एका बिलामध्ये त्रुटी डॉ. श्री.ग. भुतडा यांनी त्रुटी काढली. त्यानंतर त्रुटी विचारण्यासाठी समाजकल्याणचे निरीक्षक चव्हाण व अन्य एक कर्मचारी गेला.
याच वेळी भुतडा व या दोन कर्मचाºयांमध्ये शाब्दिक चकमक झाली. भुतडा यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस आल्यानंतर प्रकरण निवळले.