मयत अनोळखी इसमाची ओळख पटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:21 AM2020-12-11T04:21:48+5:302020-12-11T04:21:48+5:30

--------------------------- सारा व्यंकटेश सोसायटीतील पथदिवे बंद वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरातील सारा व्यंटकेश या सोसायटीच्या रस्त्यावरील पथदिवे ...

The deceased was not identified as Isma | मयत अनोळखी इसमाची ओळख पटेना

मयत अनोळखी इसमाची ओळख पटेना

googlenewsNext

---------------------------

सारा व्यंकटेश सोसायटीतील पथदिवे बंद

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरातील सारा व्यंटकेश या सोसायटीच्या रस्त्यावरील पथदिवे महिनाभरापासून बंद आहेत. पथदिवे बंद असल्यामुळे कामगार व नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. पथदिवे सुरु करण्यासंदर्भात सिडको प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रारीही केल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

छत्रपतीनगरात नेत्र तपासणी शिबिर

वाळूज महानगर : वडगावच्या छत्रपतीनगरात शुक्रवारी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत या शिबिरात तज्ज्ञांकडून रुग्णांची नेत्रतपासणी करुन गरजू रुग्णांना चष्मे वाटप केले जाणार असल्याचे पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, बाबासाहेब जगधने यांनी कळविले आहे.

वडगाव परिसरातून मुरुम चोरी

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील तलाव परिसरातील मुरुमाची चोरी असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करुन ट्रॅक्टर व टेम्पोमधून मुरुमाची चोरटी वाहतूक करण्यात येते. मुरुम चोरी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहेत.

---------------------------

साऊथ सिटीत रस्त्याची दयनीय अवस्था

वाळूज महानगर : साऊथ सिटी परिसरातील अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या परिसरात बहुतांश ठिकाणी कच्चे रस्ते असल्यामुळे वाहने ये-जा करताना धूळ उडत असते. सद्यस्थितीत रस्त्यावर ठिक-ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे ये-जा करणाऱ्या दुचाकी व चारचाकीस्वारांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकात नाराजीचा सूर उमटत आहे.

नगररोडवरील झाडांना वाळवी

वाळूज महानगर : पंढरपूर ते वाळूजपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना वाळवी लागली आहेत. या महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ-मोठी जुनाट झाडे आहे. उन्हाळ्यात ये-जा करणारे वाहनधारक व पादचारी या झाडांच्या सावलीत थांबत असतात. मात्र अनेक झाडांना वाळवी लागल्यामुळे ही झाडे सुकून चालली आहे. अनेकजण वाळलेल्या झाडाच्या फांद्या इंधनासाठी घेऊन जात असतात. झाडाचे वाळवीपासून संरक्षण व्हावे, यासाठी झाडांना गेरु व चुना लावण्याची मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.

---------------------------

देवगिरीनगरात वाहतुकीस अडथळा

वाळूज महानगर : सिडको परिसरातील देवगिरीनगरात रस्त्यावर बांधकाम साहित्य पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या वसाहतीत नवीन बांधकामे करण्यासाठी आणलेले विटा, वाळू, डबर आदी बांधकाम साहित्य रस्त्यालगत टाकण्यात आले आहे. या बांधकाम साहित्यामुळे ये-जा करणाऱ्यास अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे. रहदारीस अडथळा ठरणारी बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

---------------------------

सिडकोतील पोलीस चौकी सुरु करा

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील पोलीस चौकी सुरु करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहेत. गेल्या काही दिवसापासून या परिसरात चोऱ्याच्या संख्याही वाढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील पोलीस चौकी सुरु करुन रात्रीची गस्त सुरु करण्याची मागणी अशोक डोमाटे, नागेश कुकलारे आदींनी केली आहे.

---------------------------

Web Title: The deceased was not identified as Isma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.