कचरामुक्तीची मनपाची फसवी घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:22 PM2018-10-03T23:22:28+5:302018-10-03T23:24:17+5:30

सुरेवाडी-जाधवनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, संजयनगर, मुकुंदवाडीत कचऱ्याची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधीने बुधवारी दुपारी फेरफटका मारला असता स्वच्छतामागे दडलेली अस्वच्छता समोर आल्याचे ...

The Deceptive Declaration of Deception | कचरामुक्तीची मनपाची फसवी घोषणा

कचरामुक्तीची मनपाची फसवी घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देकचराच कचरा : सुरेवाडी-जाधवनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, संजयनगर, मुकुंदवाडीत





सुरेवाडी-जाधवनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, संजयनगर, मुकुंदवाडीत कचऱ्याची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधीने बुधवारी दुपारी फेरफटका मारला असता स्वच्छतामागे दडलेली अस्वच्छता समोर आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
सुरेवाडी- जाधववाडीलगत मोंढा असल्याने मोकाट जनावरे तसेच टाकाऊ कचºयाची ढिगारे दर्शनी प्रवेश करताना निदर्शनात पडले. गल्लीबोळातील नागरिकांनी ठराविक ठिकाणीच कचरा टाकावा, अशा सूचना दिल्या असल्या तरी कचरा जाळण्याच्या धुराने कायम प्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनात आले.
आंबेडकरनगर परिसरात आरोग्य केंद्राच्या नियोजित जागेवरच जळगाव रोडवर आरोग्य खराब करण्याचा प्रयत्न सुरू असून, कचºयाचा डोंगर आवारात दिसला, तर अंतर्गत वाहणाºया गटारीत कचरा ढकलून दिल्याने दुर्गंधीत अधिक भर पडलेली दिसली.
ब्रिजवाडीत मुख्य रस्त्यालगत झाडांच्या आड कचरा टाकला जात असून, काही ठिकाणी जाळला जातो तर उर्वरित कचरा नाल्यात टाकून दिल्याने मोकाट जनावरे परिसरात अस्वच्छता पसरवीत असल्याचे चित्र निदर्शनात आले.
संजयनगरातील मुख्य रस्त्यालगतच्या गटारी तुडुंब भरल्या असून, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या भिंतीला कचराकुंडीचे स्वरूप देऊन ही कोणती स्वच्छता असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
मुकुंदवाडीतील आरोग्य केंद्रासमोरच्या गटारीत कर्मचाºयांनीच केरकचरा टाकल्याने दुर्गंधी पसरली असून, मनपा शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच कचरा टाकून अस्वच्छतेचे प्रदर्शन घडविल्याचे दिसले.

वॉर्ड व प्रत्यक्ष परिस्थिती

- सुरेवाडी- जाधववाडी- अनेक ठिकाणी कचºयाची ढिगारे दिसली. कचरा जाळल्याने धुराचे लोट उडतानाही दिसले. महापालिकेने कोणत्या आधारावर वॉर्ड कचरामुक्त केला हे नागरिकांना कळेना.
- आंबेडकरनगर- या वॉर्डात आरोग्य केंद्राच्या नियोजित जागेलाच कचरा डेपो बनविण्यात आला आहे. कचरा हटलेला नसताना वॉर्ड कचरामुक्त कसा बनला हा प्रश्नच आहे. दुर्गंधीनेही नागरिक त्रस्त आहेत.
- ब्रिजवाडी- या परिसरात नागरिकांसह महापालिकेने कचरा कुपाटीआड कचरा दडवला आहे. काही भागात गटारीमध्ये कचरा टाकण्यात आल्याचे चित्र आहे.
- संजयनगर मुकुंदवाडी- या वॉर्डातील काही नाल्यांमध्ये कचरा टाकण्यात आला आहे. महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर कचरा उचलण्यात आला आहे. मात्र, वॉर्ड कचरामुक्त झालेला नसल्याचे दिसले.
- मुकुंदवाडी- आरोग्य केंद्रासमोरील नालीत कचरा टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. महापालिकेच्या शाळेसमोर कचरा साचल्याचे चित्र दिसले.

Web Title: The Deceptive Declaration of Deception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.