नव्या विमानसेवेवर महिनाअखेर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:55 AM2017-10-11T00:55:39+5:302017-10-11T00:55:39+5:30
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रतीक्षा असलेल्या नव्या विमानसेवेवर आॅक्टोबरअखेर शिक्कामोर्तब होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रतीक्षा असलेल्या नव्या विमानसेवेवर आॅक्टोबरअखेर शिक्कामोर्तब होणार आहे. झूम एअरचे अधिकारी दिवाळीनंतर विमानतळास भेट देणार असून, त्यानंतर विमानसेवेसंदर्भात अंतिम निर्णय होईल.
चिकलठाणा विमानतळावरून विमानसेवा वाढविण्यासाठी प्राधिक रणाकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमुळे विमान कंपन्यांकडून विमानसेवा सुरू करण्यासाठी चाचपणी केली जात आहे. औरंगाबादहून कोणत्या शहरांसाठी विमानसेवा सुरू करणे फायद्याचे ठरेल, येथील प्रवाशांची संख्या अशा विविध बाबींचा कंपन्यांकडून आढावा घेऊन निर्णय घेतला जात आहे.
तीन महिन्यांपूर्वी दिल्ली-औरंगाबाद सेवेसाठी झूम एअरने तयारी दर्शविली. या कंपनीक डून विमानसेवेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. केवळ वेळापत्रक जाहीर करणे बाकी असून, आॅक्टोबरपासून ही सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार कंपनीचे अधिकारी लवकरच विमानतळास भेट देऊन निर्णय जाहीर करतील. त्यामुळे आॅक्टोबरअखेर विमानसेवेचा मार्ग मोकला होईल, असे प्राधिकरणाच्या अधिका-यांनी सांगितले. सध्या विमानतळावरून एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीच्या विमानसेवेमुळे शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी जोडले आहे.