अवकाळीचा फटका, १० दिवसांत एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत जाहीर करू: अब्दुल सत्तार

By बापू सोळुंके | Published: April 13, 2023 07:28 PM2023-04-13T19:28:12+5:302023-04-13T19:28:39+5:30

राज्यात ४३ हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे

Decision in 10 days, Agriculture Minister Abdul Sattar's announcement to provide more assistance than NDRF norms | अवकाळीचा फटका, १० दिवसांत एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत जाहीर करू: अब्दुल सत्तार

अवकाळीचा फटका, १० दिवसांत एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत जाहीर करू: अब्दुल सत्तार

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: अवकाळी पावसासोबतच झालेल्या गारपीठमुळे राज्यातील सुमारे ४३ हजार हेक्टश्रवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या नुकसानीची २४ तासांत कृषी आणि महसूलचे अधिकारी संयुक्त पंचनामे पूर्ण करतील आणि पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा शासनाकडून केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

हिमायतबाग येथील कृषी विद्यापीठाच्या विज्ञानभवन येथे त्यांनी मतदार संघातील कामांसंदर्भात कृषीमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, अतिवृष्टी, संततधार, परतीचा पाऊस आणि आता अवकाळी, गारपीठ अशा प्रकारे सहा महिन्यात चाैथ्यांना शेतीमालाचे नुकसान झाले आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या झालेल्या अवकाळी आणि गारपीठमुळे राज्यात सुमारे ४३ हजार हेक्टरवरील पिकाचे तर मराठवाड्यातील ११ हजार १६६हेक्टर आणि छत्रपती संभाजीनगर जिल््यात ५हजार ९५६ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आम्ही ज्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला नाही, त्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले आहेत. आतापर्यंत ७०टक्के पंचनामे झाले आहेत. २४ तासांत उर्वरित पंचनामे पूर्ण होतील आणि पुढील १० दिवसांत बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय राज्यसरकार घेईल, असे त्यांनी नमूद केले.

एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत दे्ऊ
गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. तशीच मदत गारपीठमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासन देईल, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले. प्राप्त होणारी पंचनामे वस्तूनिष्ठ आहे अथवा नाही, याबाबतची पडताळणी कृषी आयुक्त आणि महसूल आयुक्त संयुक्तपणे २४ तासांत करतील. यानंतर शेतकऱ्यांना नूकसानभरपाई देण्याची कार्यवाही शासनाकडून होईल.

Web Title: Decision in 10 days, Agriculture Minister Abdul Sattar's announcement to provide more assistance than NDRF norms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.