कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचा शांतता समितीच्या बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:04 AM2021-09-03T04:04:12+5:302021-09-03T04:04:12+5:30
औरंगाबाद : तिसरी लाटच येऊ नये, यासाठी गणरायाला नमन करून कोरोना नियमांचे पूर्णपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचा ...
औरंगाबाद : तिसरी लाटच येऊ नये, यासाठी गणरायाला नमन करून कोरोना नियमांचे पूर्णपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प शांतता समितीच्या बैठकीत गणेश भक्त व मान्यवरांनी केला.
१० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून या अनुषंगाने तापडिया नाट्यमंदिरात पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार इम्तियाज जलिल, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, माजी खासदार चंद्रकांत खैरे, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा गणेश महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देशमुख, उपायुक्त मीना मकवाना तसेच बबन डिडोरे, पंजाबराव वडजे आदींसह पाच प्रमुख महासंघाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी तर उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी आभार मानले.
चौकट...
नियमांचे पालन करण्याचा निर्धार
गणेश उत्सव मंडळाच्या नोंदणी तसेच परवानगीसाठी एकखिडकी योजना सुरू करणे
रस्त्यावरील खड्डे, सफाई, विजेचा प्रश्न याकडे लक्ष देणे
सार्वजनिक मूर्ती चार व घरगुती दोन फुटाच्यावर नको
विसर्जन प्रक्रियेसाठी नैसर्गिक हौद तयार करणे
विविध महासंघ आणि मंडळांनी आरोग्याविषयी तसेच जनजागृतीच्या कार्यक्रमावर भर देणे