शिवसेनेच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:26 AM2017-08-23T00:26:58+5:302017-08-23T00:26:58+5:30

शहरात महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाºया घरपट्टी, नळपट्टी व मालमत्ता करवाढी विरोधात आंदोलन करण्याच्या अनुषंगाने शिवसेनेची मंगळवारी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली़ या बैठकीत आंदोलन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले़

The decision of the movement for Shiv Sena meeting | शिवसेनेच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय

शिवसेनेच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरात महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाºया घरपट्टी, नळपट्टी व मालमत्ता करवाढी विरोधात आंदोलन करण्याच्या अनुषंगाने शिवसेनेची मंगळवारी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली़ या बैठकीत आंदोलन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले़
आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, विधानसभा प्रमुख माणिक पौंढे, तालुकाप्रमुख नंदकुमार आवचार, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, युवा सेना शहरप्रमुख बाळराजे तळेकर, विशू डहाळे आदींची उपस्थिती होती़ यावेळी झालेल्या बैठकीत मनपाच्या घरपट्टी, नळपट्टी व इतर मालमत्ता कराच्या अवाजवी वाढी विरोधात संपर्कप्रमुख आ़ सुभाष भोईर, खा़ संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आ़ डॉ़ राहुल पाटील सर्व पदाधिकाºयांसमवेत २४ आॅगस्ट रोजी मनपा कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले़ यावेळी बोलताना आ़ डॉ़ पाटील म्हणाले की, अवाजवी कर वाढीमुळे मनपा प्रशासन व सत्ताधारी यांच्या भूमिकेविषयी नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे़ मनपा केवळ आक्षेप अर्ज स्वीकारून सुनावणी घेण्यापलीकडे काहीही कारवाई करीत नाही़ त्यामुळे आता शिवसेना आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले़ यावेळी बोलताना डॉ़ विवेक नावंदर म्हणाले की, महानगरपालिका नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे़ असे असतानाही कित्येक पटीने कर वाढ करून मनपा नागरिकांना वेठीस धरीत आहे़, हे शिवसेना खपवून घेणार नाही़

Web Title: The decision of the movement for Shiv Sena meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.