विद्यार्थीसंख्येत झाली घट; शाळेने ३२ शिक्षक व कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 07:13 PM2020-08-12T19:13:57+5:302020-08-12T19:17:04+5:30

संतप्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी स्वामी विवेकानंद अकादमीच्या व्यवस्थापनाला विचारला जाब

Decline in student numbers; The school fired 32 teachers and staff | विद्यार्थीसंख्येत झाली घट; शाळेने ३२ शिक्षक व कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

विद्यार्थीसंख्येत झाली घट; शाळेने ३२ शिक्षक व कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

googlenewsNext
ठळक मुद्देया शाळेतील २१ शिक्षक व ११ कर्मचारी मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील  कायम विनाअनुदानित तत्त्वावर आहेत. न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा ३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

औरंगाबाद : विद्यार्थीसंख्येतील घट व परिणामी संचमान्यतेसाठी कार्यभार, पद उपलब्ध नसल्याने चिकलठाणा एमआयडीसीतील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या व्यवस्थापनाने तीन महिन्यांचे मूळ वेतन देत ३२ जणांची सेवा समाप्त केली. त्यामुळे या शाळेत चार तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांना पाचारण करून प्रकरण हाताळण्यात आले. 

या शाळेतील २१ शिक्षक व ११ कर्मचारी मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील  कायम विनाअनुदानित तत्त्वावर आहेत. तीन वर्षांपासून पटसंख्येत घट झाल्याने उपरोक्त पदांना मान्यता नाही.  त्यामुळे त्यांना  कमी केल्याची मुख्याध्यापकांच्या हस्ताक्षरांतील पत्रे शाळा व्यवस्थापनाने सोमवारी कर्मचाऱ्यांच्या घरी स्पीड पोस्टाने पाठवून दिल्याने मंगळवारी शाळेसमोर गोंधळ झाला.

दाद मागणार
व्यवस्थापन स्वत:च मराठी माध्यमाला प्रवेश देत नाही. आम्हाला  हेतुपुरस्सर काढण्यात आले आहे. आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही शिक्षण विभाग, तसेच न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा ३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

हा निर्णय व्यवस्थापनाचा 
अकॅडमीच्या व्यवस्थापकीय मंडळाने हा निर्णय घेतलेला असून, त्यांनी नोटीसमध्ये सेवासमाप्तीचे कारणही दिलेले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. यात  स्थानिक मंडळाचा यात काय हेतू असू शकतो.
 - सत्यनारायण जैस्वाल, (व्यवस्थापक, स्वामी विवेकानंद अकॅ डमी)  

अद्याप कोणीही तक्रार घेऊन आले नाही 
विवेकानंद अकॅडमीत घडलेल्या या प्रकरणाबाबत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले की, अद्याप शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाबाबत आमच्याकडे मंगळवारपर्यंत तरी तक्रार केली नाही. मात्र, अनेक दिवसांपासून शाळेत वाद सुरू आहे. ही संस्था उच्च न्यायालयाच्या आदेशाचेही पालन करीत नाही. १९९४ पासून ही शाळा सुरू आहे. शाळा अनुदानावर आल्यानंतरदेखील या संस्थेने ते नाकारले. प्रशासन म्हणून आम्ही त्या शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू.
 - डॉ. बी.बी. चव्हाण (माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी)

Web Title: Decline in student numbers; The school fired 32 teachers and staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.