रामतीर्थ स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी सरसावले ‘समर्पण’

By Admin | Published: February 27, 2017 12:30 AM2017-02-27T00:30:04+5:302017-02-27T00:32:26+5:30

जालना : स्वच्छ जालना सुंदर जालना हाच समर्पण क्लबचा संकल्प असून, सर्वांच्या सहभागाने, सहकार्याने आपले शहर स्वच्छ करणार आहे, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष तथा समर्पणचे मार्गदर्शक राजेश राऊत यांनी केले.

'Dedication' for the Cleanliness of Ramashirth graveyard | रामतीर्थ स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी सरसावले ‘समर्पण’

रामतीर्थ स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी सरसावले ‘समर्पण’

googlenewsNext

जालना : स्वच्छ जालना सुंदर जालना हाच समर्पण क्लबचा संकल्प असून, सर्वांच्या सहभागाने, सहकार्याने आपले शहर स्वच्छ करणार आहे, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष तथा समर्पणचे मार्गदर्शक राजेश राऊत यांनी केले. जालना शहरात रामतीर्थ स्मशानभूमी येथे समर्पण सोशल क्लबच्यावतीने आयोजित स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जालना नगर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, राजेंद्र आडेप, उद्योजक श्याम लोया, नगरसेवक संदीप नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपनगराध्यक्ष राऊत म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अमरधाम स्मशानभूमी येथे स्वच्छता मोहिम राबविली. तेथून मोठ्या प्रमाणात कचरा उचलण्यात आला. तसेच आज रामतीर्थ स्मशानभूमीचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. ग्रुपच्या वतीने स्वच्छतेसह इतर सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष राऊत यांनी यावेळी सांगितले.
नगरपालिकेच्या वतीने रंगरंगोटी व प्रकाश व्यवस्था येथे उपलब्ध करण्याची मागणी यावेळी माळीकाम कारणाऱ्याने मुख्याधिकारी खांडेकर यांच्याकडे केली.
या मोहिमेत मयूर देविदान, विजयकुमार पंडीत, शांतीलाल राऊत, अ‍ॅड.महेश धन्नावत, अमोल राऊत, विपूल सुराणा, रूपेश जैस्वाल, अजय राऊत, राजू बिकनेर, गेंदालाल झुंगे, अजय मिसाळ, राकेश आग्रोल, नवीन पटेल, किशोर गोणे, सुशील पारेख, निलेश राऊत, नंदकिशोर वर्मा, नरेश जैस्वाल, गणेश कामबत्तीन, गणेश खराटे, मनोज गुळवे, पंडीत पवार, मच्छिंद्र पांडव आदींचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र भोसले यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Dedication' for the Cleanliness of Ramashirth graveyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.