बिबट्याने केली हरणाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:02 AM2018-05-16T01:02:33+5:302018-05-16T01:03:02+5:30

वाळूज शिवारात दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्यामुळे शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

The deer hunted by leopard | बिबट्याने केली हरणाची शिकार

बिबट्याने केली हरणाची शिकार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज शिवारात दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्यामुळे शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी अमरावतीचे पथक वाळूज शिवारात दाखल झाले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे.
वाळूज शिवारात मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास काही शेतकरी आपल्या शेतात गेले असता बप्पा सरोदे यांच्या शेतात एक हरिण मृतावस्थेत दिसून आले. गत काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्यामुळे हरणाची शिकार बिबट्यानेच केली असावी, असा संशय व्यक्त करीत शेतकऱ्यांनी दौलताबाद वनविभागाचे वनक्षेत्रपाल एस.वाय. गवंडर, वनरक्षक मनोज कांबळे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. दरम्यान, वाळूज शिवारात बिबट्याने हरणाची शिकार केल्याची माहिती वा-यासारखी पसरल्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वी श्रीरंग आरगडे या शेतक-यास दुचाकीवरून जात असताना बिबट्याने दर्शन दिले होते. या घटनेनंतर आठवडाभरापूर्वी राजू गायकवाड यांच्या शेतात या बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला होता. या परिसरात अधून-मधून बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे शेतीकामासाठी जाणारे शेतकरी व मजुरांत भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याचा वावर वाढल्यामुळे घाबरलेल्या नागरिक व शेतकºयांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केल्यामुळे सोमवारी या परिसरात पिंजरा लावण्यात आला होता.
सकाळी घटना आली समोर
वाळूज शिवारात सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्याचे आज सकाळी शेतक-यांना दिसून आले. या घटनेमुळे भयभित झालेल्या शेतक-यांनी वन विभागाशी संपर्क साधल्यानंतर मंगळवारी सकाळी वनक्षेत्रपाल एस.वाय. गवंडर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक मनोज कांबळे, वनमजूर प्रभू हजारे, बाबूलाल गुंजाळ, साहेबराव तुपे, मच्छिंद्र देवकर आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पहिल्बिबट्याने हरणाची मान घट्ट पकडून हरिण निपचित पडल्यानंतर त्याचा फडशा पाडल्याचे वन विभागाच्या पथकाला दिसून आले. या मृत हरणाला ताब्यात घेऊन दौलताबाद येथे शवविच्छेदन करण्यात आल्याचे वन क्षेत्रपाल गवंडर यांनी लोकमतशी बोलताना
सांगितले.

Web Title: The deer hunted by leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.