सदोष बिले वाटप

By Admin | Published: May 31, 2016 11:55 PM2016-05-31T23:55:04+5:302016-06-01T00:18:27+5:30

वाळूज महानगर : रांजणगावातील वीज ग्राहकांना सदोष बिलाचे वाटप करण्यात येत असून ग्राहकांना भरमसाठ देयके दिली जात आहेत.

Defective Bills Distribution | सदोष बिले वाटप

सदोष बिले वाटप

googlenewsNext


वाळूज महानगर : रांजणगावातील वीज ग्राहकांना सदोष बिलाचे वाटप करण्यात येत असून ग्राहकांना भरमसाठ देयके दिली जात आहेत.
वाळूज सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या रांजणगाव शेणपुंजीत जवळपास १० हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. तीन महिन्यांपासून अंदाजे बिलांचे वाटप करण्यात येत आहे. महावितरणकडून फोटो रीडिंग बिलाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र ही जबाबदारी असलेल्या खाजगी एजन्सीकडून अंदाजे बिलाचे वाटप करण्यात येत आहे. ग्राहकांच्या घरी न जाता एजन्सीचे कर्मचारी परस्पर देयके सोपवीत आहेत.
अवाच्या सवा बिले दिली जात असल्यामुळे ग्राहकांत असंतोषाचे वातावरण आहे. निर्धारित मुदतीत भरणा न केल्यास पुरवठा खंडित करण्याची धमकी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी देत आहेत. सदोष बिलाची दुरुस्ती करण्यासाठी ग्राहकांना वाळूज सबस्टेशनपर्यंत पायपीट करावी लागत आहे. अशातच भरणा करण्यासाठी गावातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकमेव केंद्र असल्यामुळे सकाळपासून रांगा लागतात. १० हजार ग्राहकांकडून महावितरणला महिन्याकाठी सव्वा कोटी रुपये मिळत असतानाही ग्राहकांना सुविधा दिल्या जात नाहीत. सदोष देयके दुरुस्त करून देण्यास महावितरणचे अधिकारीही चालढकल करीत असल्यामुळे गरीब ग्राहकांची लूट महावितरणकडून सुरू असल्याचा आरोप संतप्त जगदीश देवडे, संदीप देवडे, दीपक बडे, योगेश शेकडे, नारायण गिरी, अमोल घुले, सचिन खाडे, संजय खणके, बाबासाहेब गायकवाड, किशोर नरवडे, रमेश धनुरे आदी ग्राहकांनी केला आहे. ४ जून रोजी त्रस्त ग्राहकांतर्फे महावितरणच्या वाळूज कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दीपक बडे, दीपक सदावर्ते आदींंनी दिला आहे.

Web Title: Defective Bills Distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.