फिल्टरबेडसाठी सुरक्षा रक्षक नेमणार
By Admin | Published: March 15, 2016 12:13 AM2016-03-15T00:13:40+5:302016-03-15T01:04:44+5:30
अंबड : येथील जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टरबेडची सुरक्षा वाऱ्यावरच असे वृत्त प्रकाशित करताच या ठिकाणी पालिका सुरक्षारक्षक नेमण्यासोबतच रात्रीची गस्त वाढविणार असल्याचे सांगण्यात आले.
अंबड : येथील जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टरबेडची सुरक्षा वाऱ्यावरच असे वृत्त प्रकाशित करताच या ठिकाणी पालिका सुरक्षारक्षक नेमण्यासोबतच रात्रीची गस्त वाढविणार असल्याचे सांगण्यात आले.
जालना व अंबड या दोन शहरांतील तब्बल ४ लाख ३१ हजार नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्राला कोणतीही सुरक्षाव्यवस्था नाही. दोन्ही शहरांतील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सुरक्षा रामभरोसे असून, जालना व अंबड पालिका प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहे.लोकमतने रविवारी सकाळी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून ही बाब उघडकीस आली होती.
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर जालना शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल २१० कोटी रुपये खर्चुन जायकवाडी-जालना ही योजना पूर्णत्वास आली. जालना शहरातील सुमारे ४ लाख नागरिकांसाठी दररोज २० एमएलडी तर अंबडमधील ३१ हजार ५२१ नागरिकांसाठी दररोज २ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो. याविषयी अधिक माहिती देताना पाणीपुरवठा सभापती राहुल हिवराळे म्हणाले, जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचे हे अत्यंत महत्वपूर्ण फिल्टर बेड आहे. या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी आहेत. आवश्यक असल्यास खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्या येईल. त्याचबरोबर रात्रीची गस्तही वाढविण्यात येणार आहे. कोणी टँकरद्वारे येथून पाणी चोरी करत असल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नगर पालिकेकडून या फिल्टरबेडची लवकरच तपासणी करण्यात येईल. (वार्ताहर)