राज्य जीएसटीकडून झाडाझडती...

By | Published: November 28, 2020 04:05 AM2020-11-28T04:05:39+5:302020-11-28T04:05:39+5:30

कर चुकवेगिरीचा संशय मागील वर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांच्या तुलनेत यंदा ५१४ कोटी १२ लाख रुपयांचा जीएसटी व ...

Deforestation by state GST ... | राज्य जीएसटीकडून झाडाझडती...

राज्य जीएसटीकडून झाडाझडती...

googlenewsNext

कर चुकवेगिरीचा संशय

मागील वर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांच्या तुलनेत यंदा ५१४ कोटी १२ लाख रुपयांचा जीएसटी व व्हॅट कमी भरण्यात आला आहे. कर चुकवेगिरीच्या संशयावरून व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही कारवाई सुरू राहील. यासाठी ४ अधिकारी व २० निरीक्षक यांचे पथक तयार करण्यात आले आहे. नियमित कर भरणारे, प्रामाणिक व्यापाऱ्यांना याचा काहीच त्रास नाही. व्यापाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत, वेळेवर जीएसटी भरावा.

रवींद्र जोगदंड, उपआयुक्त, अन्वेषण विभाग, एसजीएसटी

----

व्यापाऱ्यांना अधिकचा वेळ द्यावा

कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यात कोणतेच दुमत नाही. मात्र, २४ मार्च ते ४ जूनदरम्यान लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. नवरात्रानंतर व्यवहाराने गती आली व दिवाळीपर्यंत व्यवसाय चांगला झाला. मागील वर्षीच्या तुलनेत कमीच होता. कोणत्याही व्यापाऱ्यांची कर बुडविण्याची इच्छा नसते. मात्र, काही जणांकडून कर भरणे राहून गेले असेल. त्यांना चूक सुधारण्यासाठी मुदतवाढ द्यावी. कारण कोरोनामुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत ५१ टक्के जीएसटी भरला गेला आहे.

जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

-----

१२ व्यापाऱ्यांची महिनाभरात झाडाझडती

५२६ कोटी रु. कोरोना काळात झाले जीएसटी संकलन.

Web Title: Deforestation by state GST ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.